धक्कादायक...चिप असलेली नवीन एटीएमही असुरक्षित; एसबीआयची धोक्याची घंटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 09:23 AM2019-02-12T09:23:12+5:302019-02-12T09:26:25+5:30

चीप नसलेली एटीएम कार्ड सुरक्षित नसल्याने ती 1 जानेवारीला बदलण्यात आली होती. मात्र, नव्याने दिलेली चिपची एटीएमही सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. यामुळे भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना धोक्याची सूचना दिली आहे. एसबीआयने ग्राहकांना ई-मेलद्वारे सावध राहण्यास सांगितले आहे.

आतापर्यंत मॅग्नेटीक स्ट्रीप असलेली कार्ड ग्राहकांना दिली जात होती. मात्र, या कार्डांच्या स्किमींगचा धोका होता. यामुळे अनेक फसवणुकीच्या घटना घडत होत्या.

ग्राहकांच्या खात्यामध्ये जमा असलेली रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सर्व बँकांना 31 डिसेंबरपर्यंत ईएमवी चिप असलेले कार्ड देण्यास सांगितले होते. या कार्डांचे वाटप अद्याप सुरुच असून त्या पूर्वीच ही कार्डे देखिल सुरक्षित नसल्याची भीती एसबीआयला सतावू लागली आहे.

नवी चिपवाल्या एटीएम कार्डही स्कीमरद्वारे हॅक करता येत आहेत. यामुळे ग्राहकांची माहिती चोरली जात आहे.

यामुळे ग्राहकांनीच सावध असलेले चांगले आहे. अशी कोणतीही घटना घडल्यास बँकेला त्वरित कळविण्यास सांगितले आहे. तसेच यासाठी कॉल सेंटर किंवा जवळची एसबीआय बँकेशी संपर्क साधण्यास सांगितले आहे.