Apple's sale on Amazon again, with iPhone 11, you will get a big discount on these products
Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:36 PM2020-07-18T22:36:24+5:302020-07-18T22:54:38+5:30Join usJoin usNext Amazon वर पुन्हा एकदा अॅपल मोबाईलची विक्री सुरू होत आहे. याची सुरुवात शनिवारी मध्य रात्रीपासून होईल आणि हा सेल 25 जुलैपर्यंत चालेल. यादरम्यान ग्राहकांना iPhone 11 सीरीज आणि iPhone 8 Plus सारख्या नव्या आणि जुन्या, अशा दोन्ही मॉडेल्सवर जबरदस्त सूट मिळणार आहे. याच बरोबर ग्राहकांना अॅपल iPad सीरीज आणि अॅपल वॉच सीरीजवरही तगड्या डिस्काउंटचा लाभ मिळेल. iPhone 11 संदर्भात बोलायचे तर, या सेलदरम्यान हा 64GB चा फोन ग्राहकांना 68,300 रुपयांऐवजी 62,900 रुपयांतच मिळेल. याचा अर्थ या फोनवर ग्राहकांना तब्बल 5,400 रुपयांचा फायदा होईल. अॅमेझॉनने iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max साठी कुठल्याही प्रकारच्या प्राइस डिस्काउंटची माहिती दिलेली नाही. मात्र, HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमाने ग्राहक 4,000 रुपयांचा डिस्काउंट निश्चितपणे मिळवू शकतात. iPhone 8 Plus 64GB ग्राहकांना अॅपल डेज सेलदरम्यान 41,500 रुपयांनाच विकत घेता येईल. याची किंमत सध्या 41,900 रुपये आहे. म्हणजेय या फोनवर ग्राहकांना 500 रुपयांची सूट मिळेल. अॅमेझॉन अॅपल डेज सेलदरम्यान ग्राहक iPhone 7 सीरीजवरही आकर्षक डिस्काउंटचा लाभ घेऊ शकतील. अॅमेझॉनने दिलेल्या माहितीनुसार, अॅपलच्या अनेक प्रोडक्टसोबत ग्राहकांना बँक ऑफर्स आणि डिस्काउंट मिळेल. यात नो-कॉस्ट EMI आणि HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्ड्ससोबत अॅडिशनल डिस्काउंटदेखील मिळेल. अॅपल डेज सेलदरम्यान Apple iPad सीरीजला 5,000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकला जाईल. याशिवाय ग्राहक अॅपल वॉच सीरीज 3 वर HDFC बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमाने 1,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंटचा फायदाही घेऊ शकतील. Apple MacBook Pro विकत घेतल्यास HDFC बँक कार्ड होल्डर्सना तब्बल 7,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अॅमेझॉन इंडियाच्या डेडिकेटेड पेजवर या संपूर्ण ऑफर्स मिडनाइटपासून दिसायला सुरुवात होईल.टॅग्स :मोबाइलअॅपल आयफोन ८अॅपल आयफोन ८ प्लसअॅपल आयओएस ११अॅमेझॉनMobileApple iPhone 8Apple iPhone 8 PlusApple IOS 11amazon