Anand Mahindra: करोडोंची फेरारी कार सोन्याने मढवली; आनंद महिंद्रांची 'सटकली', म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:35 PM2021-07-21T16:35:50+5:302021-07-21T16:42:58+5:30

Gold plated Ferrari of Indian american Man: हा साधासुधा फोटो नाहीय, तर ती कार एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयाची आहे, त्यात ती फेरारी आहे. यामुळे या फोटोचे वजन आणखीनच भारी आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या ट्विटलाही फॉलोअर्स देखील खूप आहेत. यावेळी आनंद महिंद्रा यांनी करोडो रुपयांच्या फेरारी कारचा फोटो पोस्ट केला आहे.

हा साधासुधा फोटो नाहीय, तर ती कार एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयाची आहे, त्यात ती फेरारी आहे. यामुळे या फोटोचे वजन आणखीनच भारी आहे.

आनंद महिंद्रांनी फेरारी कारवर आपले मत व्यक्त केले आहे. ते आता कमालीचे व्हायरल होत आहे. जाणून घ्या महिंद्रा असे का म्हणाले.

खरेतर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना वारेमाप खर्च, उधळपट्टी न करण्याचा सल्लादिला आहे. यासाठी त्यांनी अमेरिकेतील भारतीयाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

व्हि़डीओमध्ये एक सोनोरी रंगाची फेरारी कार (Gold Ferrari Car) दिसत आहे. यामध्ये दोन लोक आहेत. या व्हि़डीओमध्ये शद्ध सोन्याच्या फेरारी कारसोबत भारतीय अमेरिकी, असे म्हणतानाचा आवाज येत आहे.

यावर आनंद महिंद्रांनी म्हटले की, मला माहिती नाही की हा सोशल मीडियावर का व्हायरल होत आहे, श्रीमंताला आपला पैसा कसा खर्च करावा याचा धडा मिळायला हवा. पैसा कसा खर्च करू नये याचे उदाहरण.

54 सेकंदांचा हा व्हिडीओ 207k हून अधिकवेळा पाहिला गेला आहे. तसेच 7,529 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आनंद महिंद्रांच्या या पोस्टला सोशल मीडियावर बरेचजण सहमत असल्याचे दिसत आहेत.

एका युजरने म्हटले की मला समजत नाही की असे केल्याने काय मिळते. दुसऱ्या युजरने म्हटले की सुपरकारवर मला दया वाटत आहे. सोनेरी रंगाच्या आड लाल किंवा पिवळा रंग झाकला गेला आहे.

अन्य एका युजरने म्हटले की, प्रत्येक चमकणारी वस्तू सोने होत नाही. कारला महागड्या धातूने कोटिंग करणे पैशांचा अपव्यय आहे.

काही लोक या महिंद्रांच्या या मताला असहमत देखील होते. तसे पहायला गेले तर ती एक हौस आहे. हौसेला मोल नसते. नाहीतर लोकांनी काही लाखांच्या कारसाठी लाख, दोन लाख रुपये खर्च करून फॅन्सी नंबर घेतले नसते.