Sambhajiraje Chhatrapati: ... म्हणून भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:39 AM2022-02-11T10:39:04+5:302022-02-11T10:52:31+5:30

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील.

राज्यसभा खासदार आणि मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी कायदेशीर लढाई लढणारे छत्रपती संभाजीराजेंचा आज ५१ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विटरवरुन कृतज्ञता व्यक्त केली.

संभाजीराजेंनी मोठी पोस्ट लिहून आपल्या ५१ वर्षांच्या वाटचालीतील प्रवासाचं थोडक्यात परिपूर्ण वर्ण केलंय. तसेच, भविष्यातही अनेक संधी चालून येतील, असेही त्यांनी म्हटलंय.

आज वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्री शिछत्रपती महाराजांच्या वैभवशाली वंशपरंपरेत माझा जन्म झाला, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.

मात्र याबरोबरच लोककल्याणाचे दायित्वही जन्मतःच आपल्यावरती येते, याचीही मला सर्वथा जाणीव आहे.

छत्रपती घराण्याचा हा लोककल्याणाचा वारसा समर्थपणे पेलण्यासाठी श्री शिवछत्रपती महाराज व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या विचारांची आस घेऊन मी सदैव कार्यरत आहे.

माझ्या जीवनात आलेली प्रत्येक संधी ही मी लोककल्याणाचे साधन म्हणूनच स्वीकारली व त्याकरिताच ती वापरली देखील !

माझ्या थोर पूर्वजांची पुण्याई, मी करीत असलेले प्रामाणिक कष्ट व त्यामुळे जनतेच्या माझ्यावर असलेल्या निस्सीम प्रेम व विश्वासामुळे भविष्यातही अनेक संधी माझ्यापुढे चालून येतील.

मात्र माझ्या घराण्याच्या विचारांशी निष्ठा ठेऊन, पूर्वजांनी माझ्यावर सोपविलेल्या माझ्या जन्मजात कर्तव्याचे निर्वहन करण्यासाठी मला गरज आहे ती आपणा सर्वांच्या विश्वासाची व भक्कम पाठबळाची.....