Children's Day : बालदिनी धमाल-मस्ती, मुलांसोबत अशी करा दोस्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 01:31 PM2019-11-14T13:31:28+5:302019-11-14T13:44:05+5:30

14 नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो. यंदाचा बालदिन आपल्या मुलांसाठी कसा खास करायचा हे जाणून घेऊया

कामामध्ये व्यस्त असल्याने मुलांना हवा तसा वेळ देता येत नाही. त्यामुळे यावेळी बालदिनाच्या निमित्ताने मुलांना वेळ द्या. मोकळेपणाने संवाद साधा.

मुलांना सरप्राईझ फार आवडतं. त्यांच्यासाठी एका खास सरप्राईझ पार्टीचं आयोजन करा आणि त्यांच्या मित्र-मैत्रिणींना आमंत्रण द्या.

कल्पनाशक्तीला वाव देणारे विविध गेम्स बाजारात उपलब्ध आहेत. मुलांना गोष्टीचं पुस्तक अथवा असे गिफ्ट द्या. मुलं खूप खूश होतील.

मुलांना मोकळ्या वातावरणात फिरायला घेऊन जा. बागेत जाऊन त्यांच्यासोबत धमाल करा.

एखादा बाल चित्रपट पाहायला घेऊन जा. तसेच त्यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण एजॉय करा.

मुलांना काही कार्टून कॅरेक्टर्स प्रचंड आवडतात. ते असलेली बॅग, डब्बा, कंपास, गेम्स, ड्रेस अशा विविध गोष्टी त्यांना द्या.

मुलांसोबत धमाल करा. त्यांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करा. मुलांना समजून सांगा.