Independence Day : नवी विश्वकर्मा योजना सुरू होणार; जाणून घ्या, नरेंद्र मोदींच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 11:13 AM2023-08-15T11:13:42+5:302023-08-15T11:24:39+5:30

Independence Day : नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या...

आज स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. आपल्या भाषणात नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान नरेंद्र मोदींनी तरुणांना खूप आनंदाची बातमी दिली.

पुढच्या महिन्यात तरुणांसाठी १५ हजार कोटींची विश्वकर्मा योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदींनी केली. लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवून नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा महत्त्वाचे मुद्दे जाणून घ्या...

१) लोकशाहीच्या मजबुतीसाठी कुटुंबवादापासून मुक्तता आवश्यक आहे. कुटुंबवाद आणि घराणेशाही हे प्रतिभेचे शत्रू आहेत, क्षमता नाकारतात.

२) विश्वकर्मा योजना विश्वकर्मा जयंतीला सुरू होणार असून त्यासाठी १३-१५ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आमचे सरकार गरीबांसाठी समर्पित आहे.

३) आज भारत जुने नमुने आणि जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे जात आहे. ज्यांची पायाभरणी आमच्या सरकारने केली, त्यांचे उद्घाटनही करत आहे. आज मी ज्या पायाभरणी करत आहे त्याचे उद्घाटन तुम्ही फक्त माझ्यासाठी सोडले आहे.

४) देशात ८ कोटी लोकांनी व्यवसाय सुरू केला आणि प्रत्येक व्यावसायिक किमान १-२ लोकांना रोजगार देत आहे.

५) मणिपूरमध्ये माता-भगिनींसोबत अत्याचार झाला. अनेकांना जीव गमवावा लागला. देश मणिपूरच्या लोकांसोबत आहे, शांततेतूनच बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल.

६) १०० शाळा अशा आहेत की, जिथे मुले सॅटेलाइट बनवून सॅटेलाइट सोडण्याच्या दिशेने आहेत. मी देशातील तरुणांना सांगू इच्छितो की, संधींची कमतरता नाही, तुम्हाला हव्या तेवढ्या संधी, आकाशापेक्षा जास्त संधी देण्याची क्षमता या देशात आहे.

७) गेल्या १००० वर्षात जेव्हा देश एका ना एका आक्रमकाचा गुलाम होता. त्यावेळी अनेक महापुरुष, महिला आणि मुलांनी स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. गमावलेली समृद्धी परत मिळवायची आहे.

८) गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडायचे आहे. आजचे निर्णय १००० वर्षांची वाटचाल ठरवतील. आज आपण अशा काळात जगत आहोत, हे आपले भाग्य आहे की आपण स्वातंत्र्याच्या अमृतात जगत आहोत.

९) देश नवनवे संकल्प घेऊन पुढे जात आहे. भारतात जास्तीत जास्त युवाशक्ती आहे, क्षमता देशाचे नशीब बदलते.

१०) आपण भाग्यवान आहोत, अशा काही गोष्टी आपल्यासोबत आहेत, ज्या आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळाल्या आहेत. आज आपल्याकडे 3D म्हणजेच लोकशाही, विविधता आणि लोकसंख्या आहे.