PHOTOS: IPS जोडी! ट्रेनिंगदरम्यान केलं प्रपोज; आयुष-अनु यांची 'भारी' लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 04:41 PM2024-04-22T16:41:01+5:302024-04-22T16:49:12+5:30

अनु बेनीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल लागला. यानंतर देशातील-राज्यातील टॉपर्सवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच एक आयपीएस जोडी चांगलीच चर्चेत आली आहे.

मध्य प्रदेशातील आयपीएस अधिकारी अनु बेनीवाल यांचे यश हे अनेकांसाठी प्रेरणा आहे. पण, त्या आता त्यांच्या प्रेम कहाणीमुळे चर्चेत आल्या आहेत.

अनु बेनीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांना पती आणि आयपीएस अधिकारी आयुष जाखड प्रपोज करताना दिसत आहेत.

त्यांनी पोस्ट केलेला हा व्हिडीओ हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील आहे.

अनु यांनी व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले की, आमच्या आयुष्यातील माझ्या आवडत्या सर्वोत्तम क्षणांपैकी एक क्षण... थँक यू, आयपीएस डॉ. आयुष जाखड.

खरे तर आयुष जाखड आणि अनु बेनीवाल हे एकाच बॅचचे IPS अधिकारी आहेत. दोघांनी २०२२ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले.

आयुष यांचे वडील दिलीप जाखड हे देखील एक निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. आयुष यांना त्यांच्या वडिलांप्रमाणे आजोबांनी या परीक्षेसाठी प्रेरणा दिली होती.

आयुष जाखड हे राजस्थानातील श्रीगंगानगर येथील रहिवासी आहेत. एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली.

अनु बेनीवाल ह्या दिल्लीतील पीतमपुरा येथील रहिवासी आहेत. मागील काही काळात त्यांनी अवैध खाणकामाशी संबंधित अनेक वाहनांवर कारवाई केली.

अनु यांनी तिसऱ्या प्रयत्नात UPSC मध्ये २१७ वी रँक मिळवली, तर आयुष जाखड यांना १७४ वी रँक मिळाली. अनु बेनीवाल यांना २०१८ आणि २०१९ मध्ये अपयश आले होते.