राजकीय इनिंग सुरू करणाऱ्या कमल हासन यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घ्या काही खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2018 03:05 PM2018-02-21T15:05:56+5:302018-02-21T15:12:18+5:30

अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशी वेगवेगळी आव्हाने लीलया पेलणारे कमल हासन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

7 नोव्हेंबर 1954 रोजी एका हिंदू कुटुंबात कमल हसन यांचा जन्म झाला. कमल हासन यांचे वडिल डी.श्रीनिवासन पेशाने वकिल होते.

नायकन, विश्वरुपम, दशावतारम, अप्पू राजा, चाची 420, सागर, पुष्पक या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.

1960 साली तामिळ चित्रपटात बाल कलाकार म्हणून त्यांनी पहिली भूमिका केली.

सिने सृष्टीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन भारत सरकारने 1990 साली पद्म श्री आणि 2014 साली पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले.

1978 साली वयाच्या 24 व्या वर्षी कमल हासन यांनी नृत्यांगना वाणी गणपतेय यांच्याबरोबर लग्न केले. दहावर्ष त्यांचा संसार टिकला.

अभिनेत्री सारिकाबरोबर त्यांनी दुसरे लग्न केले. दुस-या पत्नीपासून श्रुती आणि अक्षरा या दोन मुली असून त्या सुद्धा चित्रपटसुष्टीत आहेत.

2004 मध्ये सारिकाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर त्यांनी अभिनेत्री गौतमी ताडीमाल्ला बरोबर लग्न केले.