Indian Railway: विजेवर चालणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांना शॉक का लागत नाही? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का, म्हणाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 03:58 PM2023-04-29T15:58:08+5:302023-04-29T16:05:42+5:30

Indian Railway: रेल्वे हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवासाचे साधन आहे. रेल्वेचं इंजिन, डबे, चाकं सारं काही लोखंडापासून बनलेलं असतं. मात्र अशी रेल्वे विजेवर धावत असली तरी त्यामध्ये विजेचा प्रवाह का प्रवाहित होत नाही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

रेल्वे हे भारतातील सर्वात लोकप्रिय प्रवासाचे साधन आहे. रेल्वेचं इंजिन, डबे, चाकं सारं काही लोखंडापासून बनलेलं असतं. मात्र अशी रेल्वे विजेवर धावत असली तरी त्यामध्ये विजेचा प्रवाह का प्रवाहित होत नाही, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? सर्वसाधारणपणे लोखंड आणि पाण्यामध्ये विजेचा करंट पसरण्याचा धोका अधिक असतो. मात्र तरीही ट्रेनमध्ये कधी करंट का लागत नाही, यामागे एक आश्चर्यकारक कारण आहे.

काही वर्षांपूर्वीपर्यंत बहुतांश ट्रेन ह्या डिझेल इंजिनावर धावायच्या. मात्र आता बहुतांश रेल्वेमार्गांचं विद्युतीकरण झालं आहेत. त्यामुळे बहुतांश ट्रेन ह्या वीजेवर चालतात.

ट्रेन चालवण्यासाठी विजेचा पुरवठा हा इंजिनाच्या वर असलेल्या एका डिव्हाईसमधून होतो. मात्र हा विजेचा प्रवाह इंजिन आणि ट्रेनमध्ये कधी पसरत नाही. या मागचं कारण फारच कमी लोकांना माहिती आहे.

ट्रेन विजेवर चालत असल्या तरी तुम्हाला ट्रेनमध्ये करंट लागत नाही कारण रेल्वेच्या डब्यांचा हायव्होल्टेज लाईनशी थेट संबंध नसतो. मात्र या लाईनमधून येत असलेल्या विजेचा वापर करून ट्रेन रुळांवरून धावतात.

हायव्होल्टेज लाईनमधून एका पेंटोग्राफच्या माध्यमातून विजेचा पुरवठा इंजिनाला होतो. हा पेंटोग्राफ नेहमी हायव्होल्टेज लाईनला कनेक्ट असतो.

आता प्रश्न निर्माण होतो की रेल्वेचे डबे हाय होल्टेज लाईनच्या थेट संपर्कात नसल्याने करंटपासून वाचतात. पण रेल्वे इंजिनमध्ये तर करंट उतरतो. मग यामध्ये विजेचे धक्के का जाणवत नाहीत.

त्याचं कारण म्हणजे करंट इंजिनाच्या बॉडीमध्ये उतरू नये म्हणून पेंटोग्राफच्याखाली इंसुलेटर्स लावलेले असतात. त्याशिवाय ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर, मोटार आदी इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसमधून निघाल्यानंतर रिटर्न करंट चाक आणि एक्सलमधून रेल्वेमध्ये आणि अर्थ पोटेंशियल कंडक्टरमधून परत निघून जातो.