Gold Rate:सुवर्णसंधी! सोनं स्वस्त, ५००० रुपयांनी किंमत घसरली, काय आहे आजचा भाव?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 08:48 AM2023-10-05T08:48:13+5:302023-10-05T08:57:37+5:30

Gold Rate: खरं तर काही दिवसांनी सणासुदीला सुरुवात होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील गदारोळामुळे सोन्याच्या किमतीत बदल होत आहे. ही घसरण पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का?, असं ग्राहक विचार करताय.

खरं तर काही दिवसांनी सणासुदीला सुरुवात होणार आहे. भारतात सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते. भारतात विशेषत: दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असून, विशेषत: अमेरिकन बाजारातील दबावामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी घसरून १८२७.४० डॉलर प्रति औंस झाला. तर यावर्षी ६ मे रोजी ते $2,085.40 प्रति औंसवर पोहोचले होते. त्याचवेळी चांदीचा दर ०.४८ टक्क्यांनी घसरून २१.२८ डॉलर प्रति औंस झाला आहे.

यूएस फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. ५ मे रोजी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत सुमारे ६१,७३९ रुपये होती. जो आता भाव ५६ हजारांच्या आसपास घसरला आहे.

इतकंच नाही तर मे महिन्यात ट्रेडिंगदरम्यान अहमदाबाद सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा भाव ६३,५०० रुपयांवर पोहोचला होता. अशा स्थितीत सोन्याचा भाव उच्चांकावरून ५००० रुपये प्रति १० ग्रॅमने कमी झाला आहे. गेल्या ४ महिन्यांत या किमती घसरल्या आहेत.

भारताबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सोने अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते. २४ कॅरेट सोन्याचा भाव ५६६५३ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१८९४ रुपये होता. २२ कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी संध्याकाळी ५२,००० रुपये प्रति १० ग्रॅमच्या खाली घसरला. तर चांदीचा दर ७०,००० रुपये प्रति किलो इतका राहिला आहे. मे महिन्यात चांदीचा भाव ७७२८० रुपयांवर पोहोचला होता.