Bharat Jodo Yatra : ‘टी-शर्ट' गेला अन् 'जॅकेट' आला…अखेर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत बदलला लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 01:34 PM2023-01-20T13:34:00+5:302023-01-20T13:37:56+5:30

Bharat Jodo Yatra : शिवसेना नेते संजय राऊत 'भारत जोडो यात्रे'त सामील झाले आहेत.

Bharat Jodo Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील 'भार जोडो यात्रा' अंतिम टप्प्यात आली आहे. कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर असा या यात्रेचा प्रवास असून, यात्रा आता जम्मू काश्मीरात दाखल झाली आहे.

या संपूर्ण यात्रेदरम्यान राहुल गांधींचा आगळा-वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. त्यांच्या लूकचीही चांगलीच चर्चा झाली. विशेषतः त्यांच्या टी-शर्ट लूकची जोरदार चर्चा झाली.

यात्रेच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधी पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टमध्ये दिसत आहेत. दक्षिण भारतातून उत्तर भारतात आल्यावरही राहुल टी-शर्टमध्येच दिसले. हिवाळ्यामध्ये उत्तर भारतीय कडाक्याच्या थंडीचा सामना करतात, अशा वातावरणातही राहुल टी-शर्टमध्येच होते.

यावरुन माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एक वादही निर्माण झाला होता. राहुल गांधींना थंडी का वाजत नाही, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित झाला होता. पण, आता राहुल यांचा लूक बदलला आहे.

राहुल गांधी आता टी-शर्टमध्ये नाही, तर जॅकेटमध्ये दिसत आहेत. आपल्या संपूर्ण प्रवासात राहुल यांनी फक्त टी-शर्ट परिधान केल्यामुळे सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. लोकांनी त्यांना थंडीपासून बचाव करण्याचा सल्लाही दिला.

त्यावर राहुल गांधी म्हणाले होते की, त्यांना थंडी वाजत नाही. मात्र शुक्रवारी 'भारत जोडो यात्रा' जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथे पोहोचताच राहुल यांना थंडी वाजायला सुरुवात झाली.

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसची 'भारत जोडो यात्रा' शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. गुरुवारी संध्याकाळी राहुल गांधी मशाल मिरवणुकीने लखनपूरमध्ये दाखल झाले.

मात्र, शुक्रवारी यात्रा कठुआला पोहोचली तेव्हा राहुल गांधी जॅकेट घातलेले दिसले. आता राहुल गांधींच्या नव्या लूकबाबत सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.