आपले बाप्पा २०१५

By admin | Published: September 15, 2015 12:00 AM2015-09-15T00:00:00+5:302015-09-15T00:00:00+5:30

जन गण मन आणि श्रीगणेशाच्या मातीच्या मुर्ती बनवण्यात सर्वाधिक सहभागाच्या जागतिक विक्रमानंतर लोकमत सज्ज झालंय आणखी एक विक्रम करण्यासाठी... पुणेकर हजारोंच्या संख्येने बालेवाडीमध्ये दाखल झाले असून ते बाप्पाचं भव्य कोलाज साकारतील.

अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेजण उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत असून सगळ्यांच्या चेह-यांवरून आनंद ओसंडून जात आहे.

इतक्या मोठ्या संख्येने मुलांनी बाप्पाचं चित्र करण्याचा विक्रम जागतिक स्तरावर असेल आणि गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा आहे.

बाप्पाचं विहंगम चित्र आकाशातून स्पष्ट दिसणार असल्यामुळे हेलीकॉप्टरमधून शुटिंग करण्यात येणार आहे.

ढोलताशा पथकांसह वाजत गाजत हा विक्रम घडवण्यासाठी सज्ज आहे लोकमतची टीम.

अजय अतुलही या उपक्रमात सहभागी होत असून बाप्पाची आरती गाणार आहेत सुखविंदर सिंग.

या विक्रमात सहभागी होण्यासाठी रणवीर सिंग दीपिका पदुकोणसह बाजीराव मस्तानीची टीम सज्ज झाली आहे.

उपक्रमात सहभागी झालेल्या ढोल ताशा पथकाच्या प्रतिनिधीचा सत्कार करण्यात आला या उपक्रमाचे प्रायोजक राजेश सांकला आणि संजय घोड़ावत यांच्या हस्ते.

रणवीर सिंगने ढोल वाजवण्याची हौस यावेळी भागवली.

ढोलताशाच्या तालावर नाचण्याचा मोह रणवीर सिंगला आवरत नव्हता.

बाजीराव मस्तानी या चित्रपटातील प्रमुख कलाकार असलेल्या रणवीर सिंग व दीपिका पदुकोणने या उपक्रमामध्ये आवर्जून उपस्थिती लावली.

अजय अतुल यांच्या माउली माउली व देवा तुझ्या दारी आलो या गाण्यानी कार्यक्रमात धमाल उडवून दिली.

जन गण मन आणि श्रीगणेशाच्या मातीच्या मुर्ती बनवण्यात सर्वाधिक सहभागाच्या जागतिक विक्रमानंतर लोकमत सज्ज झालंय आणखी एक विक्रम करण्यासाठी... बाल पुणेकर हजारोंच्या संख्येने बालेवाडीमध्ये दाखल झाले असून ते अशा रीतीने उभे राहतिल की प्रचंड मोठं बाप्पाचं चित्र तयार होईल.