ब्रिटीशांच्या राजाने हसत प्रस्ताव स्वीकारलेला! अख्खी मुंबई हुंड्यात आलेली; असा इतिहास जो कमी लोकांना माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 05:40 PM2023-01-29T17:40:59+5:302023-01-29T17:49:07+5:30

मुंबईची म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचीही अशीच मांडवली झालेली. अशी मुंबई जी कधीच कोणाच्या कायमची ताब्यात राहिली नव्हती...

आज देशात हुंडा घेणे कायद्याने गुन्हा आहे. हुंड्यासाठी छळ केला किंवा मागितला तर नवरदेवाकडच्यांवर गुन्हा दाखल होतो. परंतू, देशाची आर्थिक राजधानी, अनेकांचे स्वप्न आणि मायानगरी तुमची आमची मुंबई एकेकाळी ब्रिटीशांना हुंड्यात मिळालेली. असा किस्सा जो कमी लोकांना माहितीय.

पूर्वी राजे रजवाड्यांच्या काळात हिरे मानके, संघराज्ये आदींचे शगुन म्हणून आदान प्रदान व्हायचे. पण कधी मुंबईची म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बेचीही अशीच मांडवली झालेली...आजच्या पीढीला याची कमी माहिती असेल. परंतू, हे खरे आहे.

इंग्रजांपूर्वी पोर्तुगिजांचे भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर प्राबल्य होते. मग ते गोवा असेल की मुंबई सारे त्यांच्या अधिपत्याखाली येत असायचे. परंतू इंग्रज आल्यावर परिस्थिती अशी बनली की पोर्तुगिजांना सोन्यासारखे शहर असलेली मुंबई हुंड्यातील एक भेटवस्तू म्हणून द्यावी लागली.

अशी कोणती परिस्थिती होती की पोर्तुगिजांना मुंबई सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. सोन्याची खाण म्हटल्या जाणाऱ्या भारतात तेव्हा डच लोकांची येजा होऊ लागली होती. तेव्हाच पोर्तुगिजदेखील दाखल झाले होते. विस्तिर्ण समुद्र किनारा असल्याने मुंबई व्यवसाय विस्तारासाठी एक चांगली जागा होती. १५०७ मध्ये पोर्तुगिजांनी मुंबईवर कब्जा मिळविण्यासाठी हल्ला देखील केला होता. पण यश आले नाही.

मुंबईवर पोर्तुगिजच नाही तर मुघल बादशाह हुमायूंचे देखील लक्ष पडले होते. तेव्हा मुंबईवर गुजरातचा राजा बहादुर शाहचे राज्य होते. मात्र, तो पोर्तुगिजांच्या हल्ल्यांमुळे खुप त्रस्त झाला होता. अखेर एका युद्धात त्याने पोर्तुगिजांसोबत करार करत मुंबई त्यांना देऊन टाकली. 1534 मध्ये पोर्तुगिजांनी मुंबईत हातपाय पसरले होते.

मुंबई, ज्यावर आजही अनेकजण राज्य करण्याचे स्वप्न पाहतात, तिच्या इतिहासात आणखी एक पान लिहिले जाणार होते. गुजरातच्या राजाकडून मुंबई हिसकावली तरी पोर्तुगिज स्वस्थ बसू शकले नव्हते. डच, पोर्तुगिजांच्या पावलावर पाऊल ठेवून तेव्हा इंग्रजांनी भारतात प्रवेश करण्यास सुरुवात केली होती. ब्रिटिश साम्राज्याला देखील मुंबई हवी होती.

ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अखेर डाव साधण्याचे ठरविले. 1652मध्ये सुरत परिषदेत त्यांनी पोर्तुगिजांसमोर बॉम्बे खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. पोर्तुगिजांनी तो धुडकावला. यामुळे कपटी इंग्रजांनी पोर्तुगिजांना त्रास देण्यास सुरुवात केली. अशातच पोर्तुगिजांची ताकद इंग्रजांपुढे कमी पडू लागली. मुंबईत काही घडले की त्याचे पडसाद तिकडे युरोपमध्ये उमटायचे.

पोर्तुगिज राजा याला वैतागला होता. त्याने यावर एक जबरदस्त तोडगा काढला. आपली मुलगी कॅथरीनचा विवाह इंग्लंडच्या राजाशी करण्याचा निर्णय घेतला. या ब्रिटीश राजानेदेखील हसत हसत प्रस्ताव स्वीकारला. 1661 मध्ये कॅथरीनचे लग्न प्रिंस चार्ल्स द्वितीय सोबत झाले. कहाणी इथे संपली नाही, मुंबईचे भविष्य या लग्नात ठरविण्यात आले.

या लग्नासाठी पोर्तुगालने ब्रिटिश राजवटीला खूप काही दिले. त्याने तत्कालीन मुंबई इंग्लंडच्या राजाला हुंडा भेट म्हणून दिली. अशा प्रकारे मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात गेली. त्यानंतर त्यांनी 200 वर्षे संपूर्ण देशावर राज्य केले.

इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञांच्या मते मुंबई अश्मयुगापासून अस्तित्वात आहे. इ.स. 250 पूर्वीही येथे अल्प लोकसंख्या राहात होती. त्यानंतर मौर्य साम्राज्याचा शासक सम्राट अशोकच्याही मुंबई ताब्यात होती.