Ajit Pawar: "आमच्या घरातली कामं आहेत का... अजून किती सत्तेची भूक?"; अजित पवार संतापले, Eknath Shinde - Devendra Fadnavis सरकारला केले रोखठोक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 07:41 PM2022-07-25T19:41:55+5:302022-07-25T19:48:00+5:30

अजित पवार आणखी काय-काय म्हणाले, जाणून घ्या

Ajit Pawar angry on Eknath Shinde Devendra Fadnavis Govt: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तर अजित पवार यांना विरोध पक्षनेतेपद मिळाले आहे.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे सरकारमधील निर्णय घेत आहेत. या दोघांच्या सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यासोबत जुन्या सरकारच्या काही निर्णयांना स्थगितीही दिली आहे.

याच मुद्द्यावरून आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापल्याचे दिसून आले. 'ही कामे आमच्या घरची नसून जनतेची आहेत', असे ते पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. नक्की काय म्हणाले अजितदादा.. सविस्तर पाहूया

"मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही, हे शिंदे व फडणवीस यांना माहीतच असेल. त्या दोघांना आपलं चांगलं चाललंय असं वाटतंय. शिंदेनी आमच्या सरकारमध्ये काम केले तेच आज आमच्या सरकारमधील कामांना स्थगिती देत आहेत", असे अजित पवार म्हणाले.

पुढे ते म्हणाले, "सरकारे येत असतात जात असतात. हे सरकार काय ताम्रपट घेऊन आले आहे का? विकासकामे आहेत. ती का थांबवत आहात. आमच्या घरातील कामे आहेत का? जनतेच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आला होता, हे लक्षात घ्या."

"राज्यात भूकंप होणार असे अजूनही बोललं जात आहे. आता यांना अजून किती हवे आहेत. त्यांनी बहुमत घेतले ना... मग अजून किती सत्तेची भूक आहे ते तरी सांगा... सरकार बनवलं ना मग लोकांचे प्रश्न सोडवा", अशा शब्दांत अजित पवारांनी नाराजीही व्यक्त केली.