स्टाइल में रहने का! या मांजरीकडे आहेत तब्बल ६०० सनग्लासेस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:21 PM2019-07-10T15:21:37+5:302019-07-10T15:27:19+5:30

इन्स्टाग्रामवर तब्बल पाच लाख फॉलोअर्स असलेल्या सनग्लास कॅटकडे ६०० सनग्लासेस आहेत.

या मांजरीला पापण्या नसल्यानं ती डोळ्यांचं रक्षण करण्यासाठी सनग्लासेस घालते.

बगेल मांजरीचा मालक करेन मॅगगिल तिच्यासाठी विविध प्रकारचे सनग्लासेस आणतो. त्यामुळेच ती सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे.

बगेलला पापण्या नसल्यानं तिच्या डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनग्लासेस वापरावेत, ही कल्पना करेनच्या मित्राला सुचली.

सहा वर्षांची बगेल तिच्या सनग्लासेसमुळे अतिशय लोकप्रिय आहे.

अडचणीत असलेल्या प्राण्यांचा सांभाळ करा, असा संदेश करेन विविध कार्यक्रमांमधून देतो.