गरमीत घशाला गारवा देणारा कोकाकोला एकेकाळी मोफत वाटला जायचा, का? घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 06:37 PM2022-05-30T18:37:11+5:302022-05-30T19:12:21+5:30

सध्या गरमीचा कहर शिगेला पोहचलाय अशावेळी तहान भागवण्यासाठी थंड पेयांची मागणी वाढली आहे. थंड पेय म्हटली की त्यात कोकाकोलाचे नाव अगक्रमाने येते. या कोकाकोलाचा शोध कुणी आणि कसा लावला माहितीये का?

कोकाकोलाचा शोध एका सैनिकाने लावलाय. हा सैनिक आधी फार्मसिस्ट होता. त्याला ड्रगचे व्यसन होते. ते सोडण्यासाठी उपाय म्हणून तो काहीना काही संशोधन करायचा.

त्याचे नाव जॉन पेम्बर्टन. त्याने कित्येक वर्ष संशोधन केले पण त्याला यश मिळाले नाही. मग त्याला एक साथीदार मिळाला. त्याचे नाव फ्रँक रॉबिन्सन

या दोघांनी एक केमिकल कंपनी सुरु केली. मात्र पेम्बर्टनने त्याच्या जुन्या संशोधनावर काम सुरुच ठेवले.

त्याने एक तरल पेय तयार केले ज्यात त्याने सोडा मिसळला. हे त्याने जेव्हा लोकांना प्यायला दिले तेव्हा ते त्यांना फार आवडले.

अशाप्रकारे ८ मे १८८६ रोजी अटलांटामध्ये कोकोकोला तयार झाला. यात कॅफिन सिरप आणि कोका पत्तीचा समावेश होता.

याची किंमत ५ सेंट ठेवण्यात आली. अनेक रिपोर्ट्स असंही म्हणतात की डोकेदुखीवर आराम म्हणून हे पेय तयार करण्यात आले होते.

कोकोकोलाचा फॉर्म्युला जास्त काळ पेम्बर्टनकडे राहिला नाही. आटलांटामधील एक उद्योजक ग्रिस कॅलेंडर याने तो खरेदी केला व स्वत:चे उत्पादन करण्यास सुरुवात केली.

कोकोकोलाचा खप वाढवण्यासाठी त्याने हे ड्रिंक लोकांना मोफत वाटण्यास सुरुवात केली. जेणे करुन याचे व्यसन लागेल व लोक जास्त पीतील.

त्यानंतर लोकांना कोकोकोलाची अशी चव लागली की काही काळातच हे ड्रिंक प्रसिद्ध झाले.

असं म्हणतात की कोकोकोला ३ हजार ९०० प्रकारची उत्पादने बनवते. ही उत्पादने जर एक-एक करुन रोज प्यायची ठरवली तर ९ वर्ष लागतील.