आइस हॉकीचे नंदनवन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 03:39 PM2019-12-21T15:39:13+5:302019-12-21T15:49:44+5:30

जम्मू-काश्मीरमधील हिवाळा म्हणजे सर्वत्र बर्फाची चादरच. पण याच बर्फाच्या चादरीवर गेल्या काही वर्षांत आइस हॉकीचा अनोखा खेळ विकसित झाला आहे.

आइस हॉकी, स्कीइंग, आइस स्केटिंग, स्लेजिंग यांसारख्या खेळांचा बहर येतो. त्यामुळेच जम्मू-काश्मीरची आता आइस हॉकीचे नंदनवन अशी नवी ओळख झाली आहे. अशीच ओळख आता हिमाचल प्रदेशची होत आहे.

हिमाचल प्रदेशात लाहौल-स्पीतिमध्ये असलेल्या काजामध्ये सर्वांत ऊंच आइस हॉकी स्केटिंग रिंग तयार करण्यात आले आहे. क्रीडा विभागाकडून पहिल्यांदाच 10 दिवसांचे प्रशिक्षण शिबीर भरवण्यात आले.

हिमाचलमधील सर्वाधिक जास्त ऊंच असणार हा आइस हॉकी स्केटिंग रिंग असल्याचे सांगण्यात येते.

काजा येथील शाळांमधील मुलांमध्ये आइस हॉकी खेळणाचा उत्साह निर्माण व्हावा, या उद्देशाने आइस हॉकी स्केटिंग रिंग तयार करण्यात आली आहे.

20 डिंसेबर ते 30 डिसेंबरपर्यंत आइस हॉकीचे प्रशिक्षण पहिल्यांदा काजामध्ये दिले जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील 45 मुलांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.