Personality Development: स्ट्रेस फ्री राहण्यासाठी आवश्यक आहेत हे तीन नियम, तुम्ही करता का फॉलो?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 02:36 PM2023-02-22T14:36:06+5:302023-02-22T14:41:50+5:30

Secret of Stress Free Life: तणावाचा परिणाम आपल्या जीवनावर खूप होतो. याचा केवळ आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर आपल्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो.

Secret of Stress Free Life: आजकाल बहुतेक लोक तुम्हाला त्यांच्या आयुष्यात किती तणाव आहे याबद्दल बोलताना दिसतील. त्यांना तणावमुक्त जीवन कसे जगायला आवडते, याचा उल्लेखही अनेकवेळा त्यांच्या बोलण्यातून ऐकायला मिळतो.

प्रत्येकाला तणावमुक्त जीवन जगायचे असते परंतु आपल्या काही सवयी आपल्याला तणावमुक्त जीवनापासून दूर ठेवतात. आज आम्ही तुम्हाला असे तीन नियम सांगत आहोत जे तुम्हाला तणावमुक्त जीवन जगण्यास मदत करतील.

जेव्हा तुम्ही तणावात राहता, तेव्हा तुम्हाला जीवनातील कोणत्याही गोष्टीचा आनंद घेता येत नाही, ज्याचा परिणाम तुमच्या प्रोडक्टिव्हिटीवरही होतो. जेव्हा तुम्ही तणावमुक्त जीवन जगता तेव्हा तुमची प्रोडक्टिव्हिटी आपोआप वाढते.

प्रोडक्टिव्हिटी वाढवून, तुम्ही तुमच्या जीवनात अधिक यश मिळवू शकाल. इतकेच नाही तर तणावाचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरही खूप परिणाम होतो. म्हणूनच चांगल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त राहण्याचे काही सोपे मार्ग जाणून घेऊया.

झालेल्या गोष्टींचा विचार टाळा - तणावाचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपले अतिविचार म्हणजेच गरजेपेक्षा अधिक विचार करणे. अनेकदा आपण अशा अनेक गोष्टींचा विचार करतो, ज्या घडल्याही नाहीत. अशा परिस्थितीत आपले मन अनेकदा तणावाखाली जाते. समजा, उद्या तुमची परीक्षा आहे, तुम्ही खूप मेहनतही केलीये, पण तरीही अनेक मुले विचार करू लागतात की जर ते पास झाले नाहीत तर ते त्यांच्या पालकांना काय म्हणतील. अशा परिस्थितीत परीक्षेचा निकाल येण्याआधीच तुमच्यावर ताण येऊ लागतो. त्यामुळे तुमच्या मनात परिस्थिती निर्माण करणे थांबवा.

कायम वर्तमानात जगा - आनंदी आणि तणावमुक्त राहण्याचा मूळ मंत्र म्हणजे तुम्ही नेहमी वर्तमानात जगले पाहिजे. लोक एकतर त्यांच्या भविष्यामुळे तणावग्रस्त असतात किंवा त्यांच्या भूतकाळातील आठवणींनी त्रस्त असतात. दोन्ही प्रकरणांमध्ये, तुमचा फोकस आणि प्रोडक्टिव्हिटी प्रभावित होते. त्यामुळे तणावमुक्त रहायचे असेल तर नेहमी वर्तमानात जगा.

आता तुम्ही जे काही करत आहात ते पूर्ण मेहनत आणि समर्पणाने करा. समजा तुम्ही एखाद्या पार्टीला गेलात, तिथेही तुम्ही भूतकाळ आणि भविष्याची चिंता करण्यात व्यस्त असाल, तर तुम्ही त्या क्षणाचा आनंद घेऊ शकणार नाही. कदाचित नंतर तुम्हाला काळजी वाटेल की तुम्हाला पार्टीचा आनंद घेता आला नाही.

तुमच्याकडे काय आहे यावर लक्ष द्या - आपण अनेकदा पाहिलं असेल की आपल्याला जे मिळतं त्याची आपण कदर करत नाही, पण जे आपल्याजवळ नाही, त्याचाच आपण दिवसभर विचार करत राहतो. तथापि, जर तुम्हाला तणावमुक्त जीवन जगायचे असेल तर तुम्ही मिळवलेल्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा. यासाठी तुम्ही छोटे यशही सेलिब्रेट करणे गरजेचे आहे.

टॅग्स :आरोग्यHealth