सावधान! डिस्पोजेबल कपमधून पाणी, चहा, कॉफी पिणं अत्यंत घातक; 'या' गंभीर आजाराचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:50 PM2023-08-06T14:50:43+5:302023-08-06T14:54:41+5:30

ऑफिसपासून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत हे कप वापरले जात आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की डिस्पोजेबल कप आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात.

आजचा जमाना बदलला आहे. आता डिस्पोजेबल कपने स्टील, काचेच्या ग्लासची जागा घेतली आहे. पाणी, चहा, कॉफी किंवा इतर कोणत्याही पेयासाठी डिस्पोजेबल कप सर्वत्र हमखास वापरले जात आहेत.

ऑफिसपासून मोठ्या रेस्टॉरंटपर्यंत हे कप वापरले जात आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की डिस्पोजेबल कप आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात. या कपचा वापर करताना सावध राहा. यामुळे होणारं नुकसान जाणून घेऊया..

प्लास्टिक आणि रसायनांचा वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जर तुम्ही दीर्घकाळ वापरत असाल तर यामुळे कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टरांनी सांगितले की, डिस्पोजेबल कपमध्ये बिसफेनॉल आणि बीपीए सारखं केमिकल आढळतं.

कपमध्ये आढळणारं हे केमिकल अत्यंत घातक केमिकल आहे. या कपमध्ये चहा किंवा गरम पाणी प्यायल्यास त्यातील केमिकल त्यामध्ये विरघळतं आणि ही केमिकल पोटात पोहोचतात, ज्यामुळे कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डिस्पोजेबल कप बनवण्यासाठी फक्त केमिकलचा वापर केला जात नाही, तर मायक्रोप्लास्टिकचा देखील वापर केला जातो. त्यामुळे थायरॉईडसारखे धोकादायक आजार होऊ शकतात.

दीर्घकाळ वापर केल्याने कॅन्सर देखील होऊ शकतो. अल्कोहोल किंवा धूम्रपान करणाऱ्यांमध्ये डिस्पोजेबल कप वापरल्याने कॅन्सरचा धोका खूप लवकर वाढू शकतो. म्हणूनच डिस्पोजेबल कप वापर टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

चहा, कॉफी किंवा पाणी पिण्यासाठी प्लास्टिक किंवा कागदाचा वापर टाळावा, असे डॉक्टर सांगतात. याऐवजी इतर भांडी वापरा. आरोग्याबाबत काही तक्रारी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.