आरोग्य सांभाळा! चाळीशीनंतर महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; दुर्लक्ष करणं पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 12:08 PM2024-02-22T12:08:38+5:302024-02-22T12:22:42+5:30

5 गंभीर समस्या आहेत ज्याबाबत प्रत्येक स्त्रीने सतर्क राहायला हवं. त्याबद्दल जाणून घेऊया...

पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त फिजिकल स्ट्रेस सहन करावा लागतो. वेळोवेळी होणाऱ्या हार्मोनल बदलांमधून जावं लागतं. अशा परिस्थितीत महिलांनी वेळीच आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेतली पाहिजे.

जनरल फिजिशियन डॉ. टॉम जेनकिन्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा महिलांना असं वाटतं की वयाच्या 40 वर्षांपर्यंत आपण पूर्णपणे निरोगी आहोत, परंतु नंतर अचानक त्यांना आरोग्याशी संबंधित काही समस्या येऊ लागतात.

याचं कारण म्हणजे त्यांना हा त्रास अचानक झाला नसून, त्यांनी स्वतःची योग्य काळजी घेतली नाही, त्यामुळे त्यांना हा त्रास झाला आहे. 5 गंभीर समस्या आहेत ज्याबाबत प्रत्येक स्त्रीने सतर्क राहायला हवं. त्याबद्दल जाणून घेऊया...

स्त्रियांमध्ये या स्थितीचा धोका जास्त असतो, कारण मेनोपॉजची वेळ जवळ येताच हाडं कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे वेळेत डॉक्टरकडे जा आणि FRAX स्कोअरबद्दल माहिती मिळवा जो पुढील 10 वर्षांत फ्रॅक्चर होण्याची शक्यतेबद्दल सांगतो. जर तुमची हाडं कमकुवत असतील तर डॉक्टर तुम्हाला कॅल्शियम सप्लिमेंट देतील.

रिपोर्टनुसार, दर 28 पैकी एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असतो. तुमच्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यास, वेळोवेळी डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घ्या.

सर्वाइकल कॅन्सर हा बहुतेक महिलांचं वय 35 ते 44 वर्षे असताना होऊ शकतो. यापासून आपला बचाव करण्यासाठी तीन वर्षांनी स्क्रीनिंग केलं पाहिजे. ही टेस्ट काही मिनिटांची असते.

जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की, जगभरातील 15 ते 49 वयोगटातील 30 टक्के स्त्रिया एनिमियाने ग्रस्त आहेत. ऊर्जेचा अभाव, श्वासोच्छवासाचा त्रास, हार्ट रेट वाढणं, त्वचा पिवळी पडणं ही त्याची कारणे आहेत. यासाठी तुमच्या डॉक्टरांकडे जा.

वयाच्या 40 व्या वर्षी हार्ट अटॅकचा धोका वाढू लागतो. हे सहसा हाय कोलेस्ट्रॉल किंवा हाय ब्लड प्रेशरमुळे होतं. तुम्ही धूम्रपान करत असल्यास किंवा कौटुंबिक इतिहास असल्यास तुम्हाला जास्त धोका आहे.

जर तुमचं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर जास्त असेल तर दरवर्षी तुमचं कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर तपासा. आरोग्याची नीट काळजी घ्या. काही समस्या जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.