आरोग्य राखायचंय? जेवणानंतर 'या' गोष्टी टाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:34 PM2019-07-09T15:34:32+5:302019-07-09T15:38:06+5:30

योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं असतं. मात्र जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास त्याचा पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो. त्याऐवजी जेवणानंतर ४५ मिनिटांनी कोमट पाणी प्या.

व्यायाम शरीरासाठी चांगला असतो. मात्र जेवणानंतर व्यायाम केल्यास शरीरावर ताण पडतो आणि त्याचा पचन क्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो.

धूम्रपान शरीरासाठी घातक असतं. मात्र जेवणानंतर लगेच केलेलं सर्वाधिक धोकादायक असतं.

दिवसभर काम करुन थकल्यावर जेवण केलं की लगेच झोप येते. मात्र जेवणानंतर लगेच झोपणं टाळा.

धावणं हा उत्तम व्यायाम आहे. मात्र जेवणानंतर लगेच धावू नका. जेवणानंतर ४-५ तासांनंतर धावा. अन्यथा पचनाच्या समस्या उद्भवतील.

जेवणानंतर लगेच वाचन करणं किंवा वाहन चालवणं टाळा. जेवणानंतर शरीरातील बरीचशी उर्जा पचनक्रियेत जाते. त्यामुळे इतर क्रियांसाठी पुरेशी उर्जा मिळत नाही.

जेवणानंतर त्वरित फळं खाणं टाळा. कारण फळांमध्ये असलेली साखर जेवणातील प्रोटिन्सच्या संपर्कात आल्यावर पचनक्रियेचा वेग मंदावतो.