CoronaVirus : कोरोना रुग्णांसाठी असे ऑर्डर करा DRDOचे 2DG औषध; वापरासंदर्भात DCGI नं दिले महत्वाचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 04:38 PM2021-06-01T16:38:28+5:302021-06-01T16:51:15+5:30

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)च्या क्लिनिकल परीक्षणात दिसून आले आहे, की हे औषध घेतल्यास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते. (CoronaVirus How to order drdo 2dg anti covid 19 drug from dr reddy here is the answer)

आपल्याला माहीतच आहे, की DRDO ने विकसित केलेले 2DG औषध हे कोरोनावरील उपचारात कामी येत आहे. हे ‘2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज' औषध एका पाउचमध्ये पावडर स्वरुपात आहे आणि ते पाण्यासोबत घेतले जाऊ शकते.

2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-डीजी)च्या क्लिनिकल परीक्षणात दिसून आले आहे, की हे औषध घेतल्यास रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत मिळते.

याच बरोबर, या औषधाने रुग्णही लवकर बरे होतात. तर जाणून घेऊया, कोरोना रुग्ण DRDO चे 2DG औषध कशा पद्धतीने ऑर्डर करू शकतात.

कोरोनाग्रस्त रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि प्रिस्क्रिप्शननुसार 2डीजी औषध दिले जाऊ शकते.

रुग्ण अथवा रुग्णाचे नातलग या औषधासाठी संबंधित रुग्णालयाला हैदराबाद येथील 'डॉ. रेड्डी लॅब'सोबत ई-मेलच्या सहाय्याने संपर्क साधण्यास सांगू शकता.

2DG च्या वापरासंदर्भात DCGI नं दिले असे निर्देश - 2DG औषधाला रुग्णालयातील कोरोना बाधितांच्या उपचारात, देखभालीच्या मानकानुसार, एका सहायक थेरपीच्या स्वरुपात आपात्कालीन वापरासाठी मुंजुरी देण्यात आली आहे.

मध्यम ते गंभीर कोरोना रुग्णांसाठी जास्तीत जास्त 10 दिवसांच्या अवधीकरिता डॉक्टरांकडून 2DG औषध लवकरात लवकर निर्धारित केले जावे.

अनियंत्रित मधुमेह, गंभीर हृदय रोग, एआरडीएस, गंभीर यकृत आणि कमकुवत किडनी असलेल्या रुग्णांचे अद्याप 2डीजीसोबत अध्ययन करण्यात आलेले नाही. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी.

2DG औषध गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आणि 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या रुग्णांना देऊ नये.

2DG च्या वापरासंदर्भात DCGI चे महत्वाचे निर्देश -