Veerappan Unsung Stories: वीरप्पनच्या ऐकलेल्या न ऐकलेल्या गोष्टी; किती क्रूर होता, अंगावर शहारे येतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 01:57 PM2022-03-31T13:57:07+5:302022-03-31T14:08:46+5:30

वीरप्पनने वयाच्या 10 व्या वर्षी पहिल्यांदा हत्ती मारल्याचे सांगितले जाते. वयाच्या 17 व्या वर्षी पहिला खून केला होता. पुष्पामध्येही सांगितल्या जाणार नाहीत अशा गोष्टी.

वीरप्पन हे नाव कोणाला माहीत नसेल. तोच वीरप्पन ज्याच्या स्टोरीवर पुष्पा हा सिनेमा आला. खुप गाजला. परंतू अनेक अशा गोष्टी होत्या ज्या त्या सिनेमाच्या पहिल्या भागात दाखविण्यात आल्या नाहीत. या वीरप्पनच्या लंडन, अमेरिकेत पीआर एजन्सी होत्या. तान्हुल्या मुलीचा गळा घोटलेला, अशा एकसो एक कहान्या ज्या आपण कधी ऐकल्या नसतील, त्यापैकीच काही किस्से...

वीरप्पनने वयाच्या 10 व्या वर्षी पहिल्यांदा हत्ती मारल्याचे सांगितले जाते. तो हत्तीच्या कपाळाच्या मध्यभागी गोळी मारत असे. वयाच्या 17 व्या वर्षी पहिला खून केला होता.

वीरप्पनवर ५ कोटींचे बक्षीस ठेवण्यात आले होते. त्याला मारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्सवर 100 कोटी रुपये खर्च करण्यात आले. 2004 मध्ये चकमकीत त्याला मारले गेले. तो आजारी होता, उपचारासाठी गुपचूप शहरात नेले जात होते. तेव्हा त्याला जंगलाच्या वेशीवरच गाठून मारण्यात आले. हा प्लॅन सुरक्षा यंत्रणांनीच बनविला होता, त्यात वीरप्पन अडकला.

वीरप्पनने 1991 मध्ये मुथुलक्ष्मीशी लग्न केले. याहून धक्का देणारी बाब म्हणजे वीरप्पनच्या मिशा आणि त्याची बदनामी याला मुथुलक्ष्मी भुलली होती. त्याकडे आकर्षित होऊन तिने वीरप्पनशी लग्न केले.

1993 मध्ये त्याने तामिळनाडूच्या जंगलात गस्त घालणाऱ्या 21 पोलिसांना बॉम्बने उडवून दिले होते. याद्वारे एवढी दहशत निर्माण केलेली की कर्नाटक आणि तामिळनाडूच्या सरकारांनाही त्याची भीती वाटत होती.

वीरप्पनकडे खूप पैसा होता पण तो एक जुना टेपरेकॉर्डर, एक ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन आणि काही अश्लिल फिल्म कॅसेट सोबत बाळगायचा. त्याची वेशभूषाही गचाळ होती.

वीरप्पन अशिक्षित होता पण त्याने प्रसिद्धीच्या झोतात कसे रहायचे याचे चांगले कसब आत्मसात केले होते. त्य़ाच्याकडे ब्रिटन, न्यूयॉर्कमधील चांगल्या पीआर एजन्सी होत्या. ज्या द्वारे त्याने परदेशातही कुख्यात प्रसिद्धी मिळविली होती.

वीरप्पनने 184 जणांची हत्या केली होती. त्यापैकी 97 जण पोलिसच होते. असे म्हटले जाते की जेव्हा त्याने आपल्याच मुलीचा गळा दाबला होता. त्याला तिसरी मुलगी झाल्याचे आवडले नव्हते. वीरप्पनने 2,000 हून अधिक हत्ती मारले.

हस्तीदंताची आणि चंदनाची तस्करी तो करत असे. नेहमी ठावठिकाणा बदलत असल्याने सुरक्षा यंत्रणांना तो शोधूनही सापडत नव्हता. काही वेळा त्याची समोरासमोर भेट झाली, परंतू चकमकीत तो पळून जाण्यात यशस्वी ठरला होता.

वीरप्पनने अनेक गुन्हे केले. परंतू प्रसिद्ध अभिनेते राजकुमार यांचे अपहरण प्रकरण खुप गाजले. ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना होती असे मानले जाते.