साप्ताहिक राशीभविष्य: १० राशींना आर्थिक लाभ, नोकरीत प्रगती; गुंतवणुकीतून फायदा, अनुकूल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:16 AM2024-03-03T10:16:01+5:302024-03-03T10:28:46+5:30

Weekly Horoscope: ०३ मार्च २०२४ ते ०९ मार्च २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य…

या सप्ताहात गुरुवारी बुध मीन राशीत, तर शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल. ग्रहस्थिती अशी- गुरु आणि हर्षल मेषेत, केतू कन्येत, मंगळ, शुक्र आणि प्लूटो मकरेत आहे. ७ रोजी शुक्र कोत जाईल. कुंभेत रवि, शनी आणि बुध आहे. ७ रोजी बुध मीन राशीत जाईल. तेथे राहु आणि नेपच्यून आहे.

चंद्राचे भ्रमण वृश्चिक, धनु, मकर आणि कुंभ राशीतून राहील. या सप्ताहात मंगळवारी दासनवमी, बुधवारी विजया स्मार्त एकादशी तर गुरुवारी भागवत एकादशी आहे. शुक्रवारी प्रदोष आणि महाशिवरात्र आहे. शुक्रवारी रात्री ९.२० पासून पंचक सुरु होत आहे. शनिवारी पूर्ण काळ पंचक राहील.

बुध आणि शुक्र या दोन्ही ग्रहांचे होणारे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना आर्थिक आघाडी, शिक्षण, करिअर, बिझनेस, व्यापार, वैवाहिक जीवन, कुटुंब यांमध्ये काही लाभ मिळू शकतील? काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...

मेष: हा आठवडा चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. कुटुंबीय एकजुटीने काम करत असल्याचे दिसून येईल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदाराच्या सहवासात खुश असल्याचे दिसून येईल. पैतृक संपत्तीतून धनलाभ होईल. अदांजपत्र बनवून आपण खर्च कराल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. नशिबाची साथ मिळेल. परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळेल. मुलांच्या सहवासात थोडा वेळ घालवाल. एखाद्या नवीन प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता, जी भविष्यात मोठा लाभ मिळवून देईल. सकाळी फिरावयास जाणे, योगासन व ध्यान-धारणा इत्यादींचा दिनचर्येत समावेश करावा.

वृषभ: हा आठवडा उत्तम आहे. प्रणयी जीवन उत्तम असेल. वैवाहिक जीवनात काहीसा तणाव असल्याचे दिसले तरी आपण कौशल्यपूर्वक तो दूर करण्यात यशस्वी व्हाल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करावयाची असेल तर त्यासाठी हा आठवडा अनुकूल आहे. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. नोकरी करणाऱ्यांनी सध्याच्या नोकरीत टिकून राहणे हितावह आहे. व्यवसायात काही नवीन योजनांची अंमलबजावणी करून प्रगती करण्यात यशस्वी होऊ शकाल. खर्च वाढतील. फिरण्यासाठी खर्च कराल. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

मिथुन: हा आठवडा खूपच चांगला आहे. वैवाहिक जीवनाचा भरपूर आनंद घेऊ शकाल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. मनःशांतीसाठी काही काळ धार्मिक कार्यक्रमात व्यतीत कराल. भावाच्या विवाहात येत असलेले अडथळे एखाद्या नातेवाईकाच्या मदतीने दूर होतील. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. नोकरीत प्रगती होईल. व्यवसायात योजना पुन्हा सुरु करण्यात आपण यशस्वी व्हाल. प्रेमिकेस एखादी भेटवस्तू देऊ शकता.

कर्क: या आठवड्यात खुश असल्याचे दिसून येईल. वैवाहिक जीवनात सुख-शांतता नांदेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. एखाद्या स्पर्धेत सहभागी होणार असाल तर खूप मेहनत करावी लागू शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरीतील बदलीच्या बाबतीत अजाण राहाल. व्यापार वृद्धी होईल. स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी दिनचर्येत सकाळच्या फेरफटक्यास स्थान द्यावे. संपत्तीतून धन लाभ होईल. एखाद्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करू शकता, जी येणाऱ्या कालखंडात लाभ देईल.

सिंह: विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. प्रेमीजनांना प्रेमिकेचे सहकार्य मिळेल. विवाहेच्छूकांना चांगली स्थळे येतील. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. असे असले तरी जे मित्र वेळ वाया घालवत असतील त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. नोकरी करणाऱ्यांनी नवीन नोकरीच्या मागे न लागता आहे ती नोकरी टिकवून ठेवणे हितावह होईल. त्यातच भरपूर संधी मिळेल. व्यापारात प्रतिष्ठित व्यक्तींना भेटण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जमिनीत गुंतवणूक करू शकता. नवीन वाहन घ्यावयाचे असेल तर ते घेऊ शकता. हे सर्व करताना खर्चांवर नियंत्रण ठेवलेत तर ते उपयुक्त होईल.

कन्या: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. भविष्यात आपल्या उपयोगी होऊ शकेल असे खूप काही कुटुंबियांकडून शिकाल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. खर्च वाढतील. वैवाहिक जोडादारासह एखाद्या रोमँटिक रात्री भोजनास जाल. कुटुंबात मंगलकार्याचे आयोजन होईल. घर सजावटीसाठी काही खरेदी कराल. व्यापार वृद्धीसाठी एखाद्या चांगल्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल. शिक्षणात मेहनतीचे यथायोग्य फळ मिळेल. स्पर्धेत यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती मेहनत करून त्यांना देण्यात आलेली कामे पूर्ण करतील. अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. एखाद्या प्रॉपर्टीत गुंतवणूक करू शकता.

तूळ: हा आठवडा विशेष असा नाही. कुटुंबात काही ना काही कारणाने कलहाचे वातावरण राहीलच. काही कारणाने वैवाहिक जोडीदाराशी भांडण होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. सर्वांचे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हाल. मित्रांद्वारा प्राप्तीच्या संधी येतील. व्यापार वृद्धीसाठी जो प्रयत्न करत होता त्यात यशस्वी व्हाल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. जमिनीत गुंतवणूक करू शकता. एखादे घर किंवा प्लॉट खरेदी करू इच्छित असाल तर त्यात यशस्वी व्हाल.

वृश्चिक: अनेक दिवसांपासून आवडीचे काम करू इच्छित होता ते पूर्ण कराल. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याचा बेत ठरवू शकाल, ज्यात खर्च जास्त होऊ शकतो. नोकरीत प्रगती होईल. व्यापारात प्रगती करण्यात यशस्वी व्हाल. अविवाहितांच्या विवाहाची बोलणी होण्याची संभावना आहे. अधिकारी वर्गाशी संवाद साधताना वाणीत गोडवा ठेवावा. वैवाहिक जीवनात थोडासा तणाव असल्याचे दिसेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्राप्तीत वाढ होईल. खर्च वाढतील. स्वतःसाठी व कुटुंबियांसाठी काही खरेदी कराल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. शिक्षणासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकता.

धनु: दीर्घ काळापासून जी महत्वाची कामे करू शकत नव्हता, ती करू शकाल. वैवाहिक जोडीदारासह सुखद क्षण घालवून एखाद्या नवीन कार्याची सुरवात कराल. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. शैक्षणिक जीवनात जास्त मेहनत करूनच यश प्राप्ती होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. नोकरी करणाऱ्यांना अधिकारी वर्गाकडून चांगली बातमी ऐकण्यास मिळेल. जमिनीत गुंतवणूक करू शकता. आधी गुंतवणूक केली असेल तर त्याचा पूर्ण लाभ मिळेल. नवीन वाहनाचे सौख्य लाभेल. भावंडांच्या शिक्षणासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू नये. आपण आपली सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबियांचे सहकार्य लाभेल.

मकर: या आठवड्यात संबंध व नात्यास खूपच सांभाळावे लागेल. एखाद्या बाहेरील व्यक्तीच्या हस्तक्षेपामुळे मने दुखावण्याची संभावना आहे. कुटुंबियांच्या सहवासात वेळ घालवावा. एखाद्या ठिकाणी फिरावयास जाण्याची योजना आखावी. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दैनिक प्राप्तीत वाढ होईल. विद्या प्राप्तीत काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. उच्च शिक्षणासाठी आठवडा उत्तम आहे. भावाच्या विवाहात येणारा अडथळा दूर होईल. घरात मंगल कार्याचे आयोजन होईल. सर्वजण मिळून खरेदीसाठी जाल. मित्र आर्थिक मदत करतील. गुंतवणूक करताना एखाद्या जाणकाराचा सल्ला घ्यावा. नवीन नोकरीची ऑफर येईल. व्यापार वृद्धीसाठी भाऊ मदत करेल.

कुंभ: हा आठवडा अत्यंत चांगला आहे. कुटुंबियांच्या सहवासात थोडा वेळ व्यतीत करून धन संचय कसा करावा ते शिकून घ्याल. आगामी काळात ते आपल्या उपयोगी पडेल. शिक्षणात खूप मेहनत करूनच यशस्वी व्हाल. वेळ वाया दवडत असतील अशा मित्रांपासून मात्र दूर राहा. आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादे नवीन घर खरेदी करू शकता. नवीन वाहनाचे सौख्य प्राप्त होईल. वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असेल. परदेशाशी व्यापार करण्याची संधी मिळेल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक गुंतवणूक कराल. एखादी गुंतवणूक केली असेल तर पूर्ण लाभ होईल. विवाहेच्छुकांच्या विवाहाची बोलणी होऊ शकतात.

मीन: उर्जावान असल्याची जाणीव होईल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण कराल. प्रेमिकेस आपल्या मनातील विचार सांगाल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जोडीदाराशी असलेला दुरावा कमी होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नोकरीत वरिष्ठ कामाची प्रशंसा करतील. व्यवसायात यश प्राप्त होईल. परदेशात आयात-निर्यात करण्याची संधी मिळेल. मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. शैक्षणिक जीवनात यश प्राप्त होईल. सरकारी परीक्षेसाठी खूप तयारी करावी लागेल. उच्च शिक्षणासाठी आठवडा अनुकूल आहे. शेअर्स बाजारात गुंतवणूक करू शकता. घर सजावटीसाठी काही खरेदी कराल.