२९ डिसेंबरला गुरुपुष्य योग: ५ राशींना शुभ, कमाई वाढेल; गुंतवणुकीतून फायदा, धनलाभ योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 03:44 PM2023-12-19T15:44:46+5:302023-12-19T15:52:26+5:30

नोकरी, करिअर आणि आर्थिक आघाडीवर गुरुपुष्य योगाचा शुभ प्रभाव काही राशींना मालामाल करू शकतो, असे सांगितले जात आहे.

सन २०२३ ची सांगत होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असले तरी विशेष ग्रह गोचरामुळे या वर्षाचा शेवटचा कालावधी देश-दुनियेसह, काही राशींना उत्तम ठरू शकतो. विशेष म्हणजे २९ डिसेंबर रोजी अतिशय विशेष आणि महत्त्वाचा मानला गेलेला गुरुपुष्य योग जुळून आला आहे.

३१ डिसेंबर रोजी गुरु ग्रह मेष राशीत मार्गी होत आहे. त्यामुळे वर्षाचा शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. गुरु ग्रहाचे मार्गी होणे आणि गुरुपुष्य योग यांमुळे काही राशी लकी ठरणार असून, नववर्षाची सुरुवात दमदार आणि मालामाल करणारी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

गुरु पुष्य योगासह आदित्य मंगल राजयोग आणि गजकेसरी योग असे योगही जुळून येत आहेत. गुरुपुष्य योगात सोने-चांदी, घर आणि वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी जी काही खरेदी केली जाते, ती अनेक पटींनी लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. कोणत्या राशींना २०२३ ची सांगता आणि नववर्ष २०२४ ची सुरुवात शुभ ठरू शकेल, ते जाणून घ्या...

वृषभ: गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी व्यवसायात भरघोस नफा मिळेल. नोकरदारांना उत्पन्नाचे इतर स्रोत मिळतील. वर्षाच्या शेवटी उपयोगी पडतील अशा लोकांशी तुमची भेट होऊ शकते. घरासाठी काही वस्तू किंवा सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा सर्वोत्तम काळ असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत तुम्हाला मोठे फायदे मिळू शकतील.

मिथुनः गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाच्या बाबतीत प्रचंड लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगली टूर प्लॅन करू शकता. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या वर्षाचा शेवट काही चांगल्या बातमीने होईल. ऑफिसमध्येही काही चांगली बातमी येऊ शकते.

सिंह: गुरुपुष्य योग वर्षाच्या शेवटी भाग्योदय काळ मानला जात आहे. व्यवसायात चांगला नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. फायदा होईल. पैसे गुंतवल्यास नवीन वर्षात चांगला परतावा मिळू शकतो. चांगले लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या: गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे वर्षाचा शेवटचा काळ खूप छान जाणार आहे. ऑफिसच्या कामात काही मोठी जबाबदारी मिळू शकते. बॉस खूप खुश असतील. सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल. सर्वजण कामाची प्रशंसा करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. कमी गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल.

तूळ: गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी कुठेतरी अडकलेला पैसा मिळू शकतो. नोकरी व्यवसायात या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी उच्च स्थान मिळू शकते. हे वर्ष वैयक्तिक संबंधांमध्ये जवळीक वाढवणारे मानले जाते. करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी मिळू शकते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.