टाटा मोटर्स मोठा धमाका करणार; लवकरच लॉन्च होणार 'या' 5 नवीन कार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 05:11 PM2023-10-12T17:11:01+5:302023-10-12T17:14:14+5:30

भारतीय ऑटोमोबाईल बाजारातील दबदबा वाढवण्यासाठी टाटा लवकरच नवीन मॉडेल्स लॉन्च करणार आहे.

Tata Cars: Tata Motors, ही भारतातील तिसरी सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या कारच्या विक्रीत हळूहळू वाढ होत आहे. लवकरच कंपनी, आपल्या सध्याच्या मॉडेल्सचे फेसलिफ्ट मॉडेल्स आणि इलेक्ट्रिक मॉडेल्स एकामागोमाग एक लॉन्च करत आहे. आम्ही तुम्हाला पाच मॉडेल्सबद्दल सांगणार आहोत, ज्या लवकरच ग्राहकांसाठी बाजारात उपलब्ध होतील.

Tata Punch EV-टाटा मोटर्सची लोकप्रिय कार, Tata Punch चे इलेक्ट्रिक व्हर्जन लवकरच बाजारात दाखल होऊ शकते. ही कार याआधी अनेकवेळा टेस्टिंगदरम्यान स्पॉट झाली आहे. या महिन्यात ही कार लॉन्च केली जाऊ शकते.

Tata Harrier Facelift- टाटाच्या या कारचे फेसलिफ्ट मॉडेल 17 ऑक्टोबर रोजी लॉन्च होणार आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे, तुम्ही 25 हजार रुपये बुकिंग रक्कम भरून ही कार बुक करू शकता.

Tata Safari Facelift-Tata Safari चे फेसलिफ्ट मॉडेलदेखील 17 ऑक्टोबर रोजी ग्राहकांसाठी लॉन्च होणार आहे, या कारचे बुकिंग हॅरियर फेसलिफ्ट मॉडेलने सुरू झाले आहे. 25 हजार रुपये बुकिंग रक्कम भरून तुम्ही ही कार जवळच्या डीलरकडून बुक करू शकता.

Tata Altroz EV-Tata Altroz ​​हे देखील एक लोकप्रिय मॉडेल आहे. या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन 2024 च्या पहिल्या तिमाहीत लॉन्च केला जाऊ शकते. सध्या या कारच्या ड्रायव्हिंग रेंजबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Tata Harrier EV- हॅरियरचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केल्यानंतर टाटा या कारचा इलेक्ट्रिक व्हर्जनदेखील लॉन्च करणार आहेत. कंपनीला इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवायचे आहे, त्यामुळे अनेक मॉडेल्सचे इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केले जाणार आहे.