फक्त Top Selling च नाही तर बेस्ट मायलेज देणाऱ्या कार; 1 किलो CNG वर 35 KM पर्यंत रेंज, किंमत देखील 10 लाखांच्या आत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 11:56 AM2023-05-09T11:56:05+5:302023-05-09T12:18:04+5:30

Maruti Suzuki CNG Cars: मारुती सुझुकीच्या 10 लाख रुपयांखालील सर्वोत्कृष्ट CNG गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या...

आता मारुती सुझुकीच्या कार लाइनअपमध्ये सीएनजी वाहनांची संख्या वाढत आहे. दुसरीकडे, लोकांना मारुतीच्या सीएनजी कार देखील खूप आवडतात आणि त्यांच्या विक्रीत झपाट्याने वाढ झाली आहे. उत्कृष्ट मायलेज आणि कमी किमतीमुळे, इतर कंपन्यांच्या कारच्या तुलनेत विक्रीच्या बाबतीत त्या खूप पुढे आहे. मारुती सुझुकीच्या 10 लाख रुपयांखालील सर्वोत्कृष्ट CNG गाड्या कोणत्या आहेत, ते जाणून घ्या...

एप्रिलमध्ये सर्वाधिक विक्री होणारी कार आणि गेल्या दोन दशकांपासून कार मार्केटवर वर्चस्व गाजवणारी वॅगन आर या यादीत अव्वल स्थानावर आहे. कारमध्ये कंपनीने 998 सीसी इंजिन दिले आहे जे 56 बीएचपी पॉवर जनरेट करते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सीएनजीमध्ये ती 34.05 किमी मायलेज देते.

मारुती वॅगन आर कारने फॅमिली कार म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. 5.52 लाख रुपयांच्या सुरूवातीच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. ही 5 सीटर हॅचबॅक आहे जी पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिएंटमध्ये दिली जाते.

मारुतीची सर्वात लोकप्रिय हॅचबॅक जी तरुणांपासून ते कुटुंबातील पुरुषांपर्यंत सर्वांची पहिली पसंती आहे. ही कार मारुती सुझुकी स्विफ्ट आहे. स्विफ्टचे सीएनजी व्हेरिएंट जे 1197 सीसी इंजिनसह येते, ते 76 बीएचपी पॉवर जनरेट करते.

तसेच, कार एक किलो सीएनजीमध्ये 31 किमी मायलेज देते. 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येणाऱ्या स्विफ्टची एक्स-शोरूम किंमत 6.7 लाख रुपये आहे. लवकरच स्विफ्टची नवीन पिढीही कंपनी लॉन्च करणार आहे. यासोबतच कारचा स्पोर्ट्स अवतारही पाहायला मिळणार आहे.

देशातील सर्वात लोकप्रिय बजेट कारपैकी एक ऑल्टो K10 कार ही 1.0-लिटर इंजिनसह ऑफर केली जाते. यापूर्वी कंपनी आपले 800 सीसी मॉडेल देखील ऑफर करत होती परंतु नवीन एमिशन नियमांनंतर ती बंद करण्यात आले. कार 47 बीएचपी पॉवर जनरेट करते.

या कारच्या मायलेजवर नजर टाकली तर ती 1 किलो सीएनजीमध्ये 31.5 किमीची रेंज देते. आपल्या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या ऑल्टोला पसंत करण्याचे कारण म्हणजे या कारची किंमत. तुम्ही ही कार 3.97 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी करू शकता. तसेत, तुम्हाला ऑल्टोमध्ये ऑटोमॅटिक वेरिएंट देखील मिळतात.

मारुती सुझुकीची मध्यम आकाराची एसयूव्ही ब्रेझा. ही अॅपल कार प्ले, क्लायमेट कंट्रोल एसी, एबीएस आणि ईबीडी सारख्या फीचर्ससह येते, ही देखील सर्वोत्तम मायलेज कारमध्ये गणली जाते. कारमध्ये 1.4 K सीरीज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 86.6 बीपीएच पॉवर जनरेट करते. दुसरीकडे, जर आपण कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास ती 1 किलो सीएनजीवर 25.51 किलोमीटर धावते.

कंपनी 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह कार ऑफर करते. अलीकडेच, कंपनीने ब्रेझाची नवीन जनरेशन देखील लाँच केली होती, तेव्हापासून ती लोकांची आवडती मिड साइज एसयूव्ही राहिली आहे. कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला ती 9.28 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीवर मिळेल.

देशातील सर्वात जास्त विकली जाणारी एमपीव्ही मारूती एर्टिगा केवळ व्यावसायिक वाहनच नाही तर एक फॅमिली कार म्हणूनही लोकप्रिय आहे. कारमध्ये 1.4 सीसी इंजिन आहे, जे 87 बीएचपी पॉवर जनरेट करते. सीएनजीवर कारचे मायलेज 26.11 kmpl आहे.

एर्टिगा 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर करण्यात आली आहे आणि या कारची सुरुवातीची किंमत 9.61 लाख रुपये आहे. तुम्हाला कारमध्ये अँड्राईड ऑटो आणि अॅपल कार प्ले सारखे फीचर्स मिळतात. तसेच, एबीएस, ईबीडी आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी देखील एर्टिगामध्ये उपलब्ध आहेत.