धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार : राम शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 11:49 AM2018-12-12T11:49:30+5:302018-12-12T11:49:30+5:30

धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित

Will meet PM for Dhangar community's reservation: Ram Shinde | धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार : राम शिंदे

धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार : राम शिंदे

Next

परभणी- धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र शासनाच्या अखत्यारित असून, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री प्रा़ राम शिंदे यांनी येथे एका  बैठकीत बोलताना दिली़ 

मुंबईहून परभणीमार्गे परळीला कार्यक्रमाला जाण्यासाठी शिंदे यांचे बुधवारी सकाळी ७़३० वाजता परभणीत देवगिरी एक्सप्रेस रेल्वेने आगमन झाले़ यावेळी त्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या निवासस्थानी भेट दिली़ यावेळी धनगर समाजातील कार्यकर्त्यांशी अनौपचारिक बैठक झाली़ याबैठकीत भुमरे यांनी धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली़ समाजाची भावना लक्षात घेऊन या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणीही यावेळी भुमरे यांनी केली़ याशिवाय अन्य तीन ते चार जणांनीही मनोगत व्यक्त करताना आरक्षणाची मागणी केली.

यावेळी जलसंधारण व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री राम शिंदे यांनी राज्य शासन धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे़ परंतु, या संदर्भातील विषय केंद्र शासनाच्या अखत्यारित येतो़ त्यामुळे लवकरच या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेणार असल्याचे ते म्हणाले. 

बैठकीस आ़ मोहन फड, माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अभय चाटे, शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, विठ्ठल रबदडे, मारोती बनसोडे, हरिभाऊ शेळके, रामप्रसाद रौंदळे, भागवत बाजगीर, अनंतराव बनसोडे, दत्तराव घोरपडे, जगदीश केंद्रे, लिंबाजी पुंजारे, आण्णा डिघोळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Will meet PM for Dhangar community's reservation: Ram Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.