कुठे विश्‍व हरवले कळले ना मला..

By Admin | Published: November 11, 2014 03:39 PM2014-11-11T15:39:23+5:302014-11-11T15:39:23+5:30

जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्‍व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का

Where did the world lose? | कुठे विश्‍व हरवले कळले ना मला..

कुठे विश्‍व हरवले कळले ना मला..

googlenewsNext
>भारत दाढेल/ नाांदेड
जग त्यांच्यासाठी, उमलले ना मन माझे, माझे मनु कोणाला उमजेना मनाला... कुठे विश्‍व हरवले कळले ना मला... दूरच्या गावी येईल का कोणी, माझ्या आनंदात नाचेल का कोणी.'.. 
भौतिक सुखात मग्न झालेल्या समाजाला जाणिवांच्या स्पर्शाने पुलकित करण्यासाठी व वंचितांच्या जगण्याला आधार देण्यासाठी प्रथेप्रमाणे यंदाही आनंदवन मित्र- परिवाराने दिवाळी स्नेहमिलनाचा कार्यक्रम साजरा करून मानवतेचा संदेश दिला. 
बजाज गॅलेक्सी मॉलसमोरील उंच, उंच इमारतींच्या शेजारी रविवारी रात्री संपूर्ण परिसर रोषणाईने नटला होता. प्रवेशद्वारापासून काढलेल्या रांगोळ्यांनी अन् भव्य मंचावर सादर होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्वांचेच मन प्रसन्न झाले. नेरली कुष्ठधाम व संध्याछाया वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, सुमन बालगृहातील अनाथ मुली, परितक्त्या महिला या सर्वांना विशेष आमंत्रण देवून त्यांच्यासाठी ही दिवाळी आनंदवन मित्र परिवाराने आयोजित केली होती. मनोरंजनासोबतच भोजन व दिवाळीची भेट देवून या पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही केली. गतवर्षी हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवित देगलूरनाका येथे दिवाळी स्नेह- मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाची चर्चा शहरभर झाली होती. यंदाही आनंदवन मित्रपरिवाराने वंचितांच्या चेहर्‍यावरील आनंदाचे क्षण टिपण्यासाठी हा भव्य कार्यक्रम घेतला. 
कार्यक्रमाची सुरूवातच वैशिष्टपूर्ण होती. अध्र्या रात्री नांदेडकरांना जागे करून खडा पहारा देणारा व जागते रहो...चा पुकारा करणारा गोरखा मंचावर बोलावून त्यांच्याच हस्ते स्नेहमिलनाचे दीप- प्रज्ज्वलन केले. एरवी दर महिन्याला दहा, वीस रूपयांची मागणी करणारा गोरखा प्रथमच मंचावर गेल्याने नेमके काय करायचे असते, या विचाराने गोंधळला. दुसरीकडे त्याच्या चेहर्‍यावर हर्षही ओसंडून वाहत होता. स्थानिक कलावंतांनी उपस्थिांचे मनोरंजन करीत नृत्य, गायन, विनोद सादर करून सर्वांची मने जिंकले. तेव्हा समोरच्या रांगेत बसलेल्या उपेक्षित, वंचितांना आमच्यासाठीच का एवढा अट्टाहास, असा प्रश्न पडत असावा. शब्दांची उधळण करीत आपल्या भावनांचा आविष्कार प्रकट करताना निवेदकाचे मनही भरून आले होते. सर्वधर्मीय पाहुण्यांच्या स्वागताला आनंदवन मित्र परिवाराच्या सदस्यांनी कोणतीच कमी ठेवली नाही. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटात काम करणार्‍या नांदेड येथील पाच कलावंतांचा गौरव या मंचावर करण्यात आला.

Web Title: Where did the world lose?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.