परभणी, पूर्णा, नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार दरवाजांतून दुधनेत सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:33 AM2018-05-09T00:33:41+5:302018-05-09T00:33:41+5:30

परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या चार दरवाजातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे.

Water left in the four-door milk for the drinking water of Parbhani, Purna and Nanded city | परभणी, पूर्णा, नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार दरवाजांतून दुधनेत सोडले पाणी

परभणी, पूर्णा, नांदेड शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी चार दरवाजांतून दुधनेत सोडले पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : परभणी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या चार दरवाजातून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दरम्यान, टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे.
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी बंधाºयातील पाणी संपत आल्याने शहराचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. त्यामुळे दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याची मागणी महापालिकेने जिल्हाधिकाºयांकडे केली होती. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रकल्पाचे चार दरवाजे अनुक्रमे १० सेमी, २०, १४ से.मी.ने उचलून सुमारे १५०० क्यूसेसने हे पाणी नदी पात्रात सोडल्याने दुधनाचे पात्र पाण्याने खळखळून वहात आहे. परभणी येथील बंधाºयात पाणी पोहचण्यासाठी ५० तास लागणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली.
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया येलदरी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने दुधना प्रकल्पातून यापूर्वी तीन वेळा पाणी घेण्यात आले होते. पूर्णा शहरासाठीही दोन वेळा पाणी देण्यात आले आहे. टप्प्या-टप्प्याने हे पाणी पूर्णा व नांदेड शहरालाही दिले जाणार आहे.

Web Title: Water left in the four-door milk for the drinking water of Parbhani, Purna and Nanded city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.