Two-day Marathi Sahitya Sammelan in Dharmapuri (Parbhani) | धर्मापुरी (परभणी) येथे दोन दिवसीय अन्य मराठी साहित्य संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :घाटगे पाटील प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाच्या वतीने ६ व ७ जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ग्रामीण साहित्यिक राजेंद्र गहाळ यांची निवड झाली असून स्वागताध्यक्षपदी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांची निवड झाली आहे.
धर्मापुरी येथील जिल्हा परिषद शाळेत होणाºया या साहित्य संमेलनाच्या स्थळाला संत चोखामेळा नगरी असे नामकरण करण्यात आले आहे. संत नामदेव महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक सय्यद जब्बार पटेल यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता गावातून ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. सरपंच शारदाताई कदम, मंगलताई कुलकर्णी यांच्या उपस्थितीत दिंडीला प्रारंभ होईल. सकाळी ११ वाजता उद्घाटनीय सत्र असून या कार्यक्रमास उद्घाटक सय्यद जब्बार पटेल, संमेलनाध्यक्ष राजेंद्र गहाळ, आ.डॉ.राहुल पाटील, आ.रामराव वडकुते, जिल्हाधिकारी पी. शिव शंकर, अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, महाराष्ट्र राज्य साहित्य, संस्कृती मंडळाचे अध्यक्ष रेणू पाचपोर, अशोक कोतवाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
विविध विषयांवर परिसंवाद
या संमेलनात बळीराजा तू जगायलाच हव, या विषयावर होणाºया परिसंवादात प्रा.डॉ.शत्रुघ्न जाधव, मीराताई कदम सहभागी होणार आहेत. ७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत शिक्षण व ग्रामीण महिला विकास या विषयावर परिसंवाद होणार आहे. प्रा.यु.एच. बलखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या परिसंवादात अशोक अर्धापूरकर, राजकुमार कºहाळे, प्रा.गणेश मारेवाड सहभागी होणार आहेत.
दुपारी १२ ते १ या वेळेत कथा-कथन होणार असून प्रा.अशोक शिंदे, संतोष पवार सहभागी होतील. दुपारी २ ते ४ या वेळेत कविसंमेलन होईल. शफी बोल्डेकर, शिवाजी गिरी, साहेब शिंदे, महासेन प्रधान, निवृत्ती पवार, शिलवंत वाढवे, बबन मोरे यात सहभागी होणार आहेत. सायंकाळी ४ वाजता समारोपीय सत्र होईल.
प्रा.यु.एच.बलखंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाºया या सत्रात हिंगोली जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, डॉ. दत्तात्रय मगर, औंढा पं.स.चे सभापती बी.आर. भगत, जि.प. सदस्य अजीत मगर, प्राचार्या वंदना शिंदे, हिंगोलीतील सहाय्यक प्रकल्प संचालक जयराम मोडके, राजकुमार वाडीकर, डॉ.संतोष पवार, संजय निकम, ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या सचिव शीतल सोनटक्के यांची उपस्थिती राहील.

 


Web Title: Two-day Marathi Sahitya Sammelan in Dharmapuri (Parbhani)
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.