आधार व्हेरीफिकेशनमध्ये परभणी जिल्हा राज्यात तिसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:46 AM2017-12-28T00:46:25+5:302017-12-28T00:46:34+5:30

सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये ६८ टक्के लाभार्थ्यांना आधार क्रमांकाच्या सहाय्याने धान्य वितरित करीत परभणी जिल्ह्याने राज्याच्या यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील आधार व्हेरीफिकेशनचे काम इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक ठरत आहे़

Third in Parbhani District State of Adequacy Verification | आधार व्हेरीफिकेशनमध्ये परभणी जिल्हा राज्यात तिसरा

आधार व्हेरीफिकेशनमध्ये परभणी जिल्हा राज्यात तिसरा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये ६८ टक्के लाभार्थ्यांना आधार क्रमांकाच्या सहाय्याने धान्य वितरित करीत परभणी जिल्ह्याने राज्याच्या यादीत तृतीय क्रमांक मिळविला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील आधार व्हेरीफिकेशनचे काम इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक ठरत आहे़
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना अल्प दरात धान्याचा पुरवठा केला जातो़ हा धान्य पुरवठा करीत असताना काळा बाजार होवू नये आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यालाच धान्याचा लाभ मिळावा, यासाठी राज्यात ई-पॉस मशीनच्या सहाय्याने धान्य वितरण करण्याची प्रणाली मे २०१७ पासून कार्यरत झाली आहे़ या अंतर्गत कुटूंबातील प्रत्येक लाभार्थ्याचे आधार क्रमांक रेशन कार्डाशी जोडण्याचे काम सुरुवातीला करण्यात आले़ परभणी जिल्ह्यात हे काम करीत असताना किमान कुटूंब प्रमुखाचे आधार क्रमांक रेशनकार्डाला जोडून घेतल़े त्यामुळे एकही कुटूंब आधार क्रमांकाअभावी धान्यापासून वंचित राहू नये, याची काळजी घेण्यात आली़ आधार क्रमांक निश्चित करून धान्य वितरित करताना काही लाभार्थ्यांचे आधार क्रमांक अजूनही पुरवठा विभागापर्यंत उपलब्ध झाले नाहीत़ त्यामुळे ई-पॉस मशीनच्या सहाय्याने कुटूंबातील कोणत्याही सदस्याच्या नावे आधार क्रमांकाशिवाय धान्याचे वितरण केले जात आहे़ जास्तीत जास्त धान्य वितरण आधार क्रमांकावरून व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत़ परभणी जिल्ह्यामध्ये १ हजार १८४ ई-पॉस मशीन असून, त्यापैकी १ हजार १८१ मशीनवरून लाभार्थ्यांना धान्याचे वितरण करण्यात आले़ डिसेंबर महिन्यातील धान्य वितरणाचा राज्यस्तरीय अहवाल इलेक्ट्रॉनिक पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (ईपीडीएस) या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे़ या अहवालानुसार परभणी जिल्ह्यात जानेवारी महिन्यामध्ये ६८ टक्के लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व्हेरीफाय करून धान्य उचलले आहे़ हे काम राज्याच्या यादीत थेट तिसºया क्रमांकावर पोहचले आहे़ त्यामुळे येत्या काही दिवसांत १०० टक्के धान्य आधार व्हेरीफिकेशनच्या माध्यमातूनच वितरित केले जाणार असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले़
नागपूर जिल्हा अग्रभागी
आधार क्रमांकाच्या सहाय्याने लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याच्या कामात नागपूर जिल्ह्याचे प्रथम क्रमांक पटावकला आहे़ या जिल्ह्यातील १ लाख ७८ हजार २५६ लाभार्थ्यांना आधार क्रमांकाच्या आधारावर ४ हजार ६०३ मे़ टन धान्याचे वितरण करण्यात आले़ राज्याच्या यादीत मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे दुसरा क्रमांक पटकावला असून, या जिल्ह्यात ७१ टक्के लाभार्थ्यांना आधार व्हेरीफिकेशनसह सार्वजनिक वितरण प्रणालीचे धान्य वितरित झाले आहे़

Web Title: Third in Parbhani District State of Adequacy Verification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.