परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूरमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 12:16 AM2019-02-19T00:16:15+5:302019-02-19T00:16:47+5:30

भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सेलू आणि जिंतूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़

In Sabhani district, Seloo, Junkhoor, Kadakadit closed | परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूरमध्ये कडकडीत बंद

परभणी जिल्ह्यात सेलू, जिंतूरमध्ये कडकडीत बंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सेलू आणि जिंतूर शहरामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला़
जिंतूरमध्ये पुलवामा घटनेच्या निषेधार्थ सोमवारी जिंतूर शहरात बंद पाळून नागरिकांनी मुख्य मार्गाने मोर्चा काढला़ त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देऊन दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली़
पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविण्यासाठी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून मोर्चाला प्रारंभ झाला़ शहरातील व्यापारी, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते़ व्यापाऱ्यांनी १०० टक्के बंद ठेवून घटनेचा निषेध केला़ दरम्यान, मोर्चेकºयांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तानला धडा शिकवा, अशा घोषणा दिल्या़ सुमारे १० हजार नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते़ जिंतूर येथील तहसीलदार सुरेश शेजूळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले़ यावेळी आ़ विजय भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, व्यापारी महासंघाचे रमेश दरगड, माहेश्वरी संघाचे जिल्हाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, भाजपाचे खंडेराव आघाव, राजेश वट्टमवार, प्रदीप चव्हाण, प्रदीप देशमुख, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, उपसभापती विजय खिस्ते, नगरसेवक कपील फारुखी, सुनील तोष्णीवाल, राजू देवकर, सत्यनारायण शर्मा, मौलाना तंजमूल, महेश चैतन्य महाराज, सुधीर शहाणे प्रदीप कोकडवार, शेख ताज, कैलास थिटे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते़
सेलू शहरातही बंद
४सेलू शहरातील सामाजिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी सोमवारी सकाळी १०़३० वाजेच्या सुमारास हल्ल्याच्या निषेधार्थ क्रांती चौकातून आठवडी बाजार, स्टेशन रोड, बसस्थानक रोड, रायगड कॉर्नर मार्गावरून फिरून बंदचे आवाहन केले़
४क्रांती चौक येथे शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ सोमवारी दिवसभर शहरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून व्यापाºयांनीही बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली होती.

Web Title: In Sabhani district, Seloo, Junkhoor, Kadakadit closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.