परभणीत कीर्तन महोत्सव ज्ञानामुळे प्रकाशाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:46 AM2019-01-15T00:46:35+5:302019-01-15T00:47:02+5:30

कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान हे त्या व्यक्तीला अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते़ त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असे मत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले़

Parbhaniat Kirtan Festival will move towards light due to knowledge | परभणीत कीर्तन महोत्सव ज्ञानामुळे प्रकाशाकडे वाटचाल

परभणीत कीर्तन महोत्सव ज्ञानामुळे प्रकाशाकडे वाटचाल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोणत्याही क्षेत्रातील ज्ञान हे त्या व्यक्तीला अंध:काराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते़ त्यामुळे प्रत्येकाने ज्ञान ग्रहण करण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे, असे मत रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी व्यक्त केले़
येथील बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या वतीने १३ जानेवारी रोजी ढोक महाराज यांचे कीर्तन आयोजित केले होते़ या प्रसंगी ते बोलत होते़ कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष पांडूरंग नावंदर यांचा ढोक महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी संस्थेचे सचिव डॉ़ विवेक नावंदर, आ़ डॉ़ राहुल पाटील, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, डॉ़ अनंतकुमार झरकर, अ‍ॅड़ अशोक सोनी आदींची प्रमुख उपस्थिती होती़
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रभारी मुख्याध्यापक अरुण कुलकर्णी, श्यामा मुधळवाडकर, साधना टाक, गरुड, सिंधू परदेशी, नितीन बोराडकर, प्रदीप रुघे, राजेश सुरवसे यांच्यासह शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले़ या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते़

Web Title: Parbhaniat Kirtan Festival will move towards light due to knowledge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.