परभणी : ‘बोंडअळी’च्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:14 AM2018-06-14T00:14:59+5:302018-06-14T00:14:59+5:30

बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़

Parbhani: Waiting for second round of 'Bondali' | परभणी : ‘बोंडअळी’च्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

परभणी : ‘बोंडअळी’च्या दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादकांना पहिल्या टप्प्यातील प्राप्त झालेल्या रकमेचे वाटप पूर्ण झाले असून, जिल्हा प्रशासनाने या वाटपाची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठविली आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यातील अनुदानाची कापूस उत्पादकांना प्रतीक्षा लागली आहे़
परभणी जिल्ह्यामध्ये मागील वर्षी सुमारे २ लाख हेक्टर कापसाची लागवड झाली होती़ या संपूर्ण पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकºयांना नुकसान सहन करावे लागले़ जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून आवश्यक असणाºया मदतीची मागणी राज्य शासनाकडे नोंदविली होती़
या पंचनाम्यानुसार ३ लाख ५१ हजार ११८ शेतकºयांच्या कापसाचे नुकसान झाले असून, या शेतकºयांसाठी १५७ कोटी ९७ लाख रुपयांची मागणी राज्य शासनाकडे नोंदविली होती़ कापसाच्या नुकसानीचा आकडा मोठा असल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले होते़ बोंडअळीग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत करावी, अशी मागणी वारंवार झाली़ या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने अनुदान वाटप करण्याचा निर्णय घेतला़ परभणी जिल्ह्याने मागणी केलेल्या संपूर्ण अनुदानाला मंजुरीही मिळाली़ तीन टप्प्यांमध्ये हे अनुदान वाटप केले जाणार असून, पहिल्या टप्प्यात ४२ कोटी रुपये प्रशासनाला प्राप्त झाले होते़ ही संपूर्ण रक्कम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकºयांना वितरित करण्यात आली असून, या रकमेचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ त्यामुळे आता दुसºया टप्प्यामधील अनुदानाची जिल्ह्याला प्रतीक्षा लागली आहे़

Web Title: Parbhani: Waiting for second round of 'Bondali'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.