पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 11:12 PM2024-05-12T23:12:40+5:302024-05-12T23:13:33+5:30

Lok Sabha Election 2024 : पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते.

PM Narendra Modi holds roadshow in Patna, Lok Sabha elections 2024 | पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी

Narendra Modi Road Show In Patna पाटणा : सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते. नरेंद्र मोदींच्या रोड शोमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. प्रचंड गर्दीमुळे रोड शोची एकूण लांबी जवळपास 3.5 किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. पाटण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा पहिलाच रोड शो होता.

पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शोपूर्वी सर्व तयारी पूर्ण झाली होती. रोड शोमध्ये पंतप्रधानांच्या स्वागतासाठी अनेकजण आले होते. लहान मुलांनी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोस्टर बनवले होते. या रॅलीत उपस्थित अनेकजण राम मंदिराच्या उभारणीमुळे खूश असल्याचे दिसून आले. एका मुलीने सांगितले की, पंतप्रधान सर्वांना समान मानतात म्हणून आम्ही त्यांना पसंत करतो. तर यावेळी एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकण्यात यशस्वी होईल आणि नरेंद्र मोदींचा नारा पूर्ण होईल, असे काही लोकांनी सांगितले.

पाटणा येथील रोड शोपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवली. अखेर बिहारच्या जनतेने त्यांना रस्त्यावर आणले, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. दरम्यान, बिहारमध्ये लोकसभेच्या एकूण 40 जागा आहेत आणि 2019 मध्ये भाजपाने जेडीयूसोबत येथे 33 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही दोन्ही पक्ष एकत्र आहेत, पण आरजेडी पूर्वीपेक्षा मजबूत आहे आणि एनडीए आघाडीला आपल्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे सोपे जाणार नाही. तसेच, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात बिहारमधील पाच जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये दरभंगा, समस्तीपूर, बेगुसराय, उजियारपूर आणि मुंगेर या जागांचा समावेश आहे.

रोड शो करण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये मोदींची सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी बिहारमध्ये रोड शो करण्यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये सभा घेतली. येथे त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी सरकार आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आपल्या भाषणात नरेंद्र मोदी म्हणाले की, "आपला महान भारत देश टीएमसी, काँग्रेस आणि डाव्यांच्या हाती देता येईल का?  टीएमसी आणि काँग्रेसची इंडिया आघाडी तुष्टीकरणाचे राजकरण करते. येथील तृणमूल आमदाराने हिंदूंना भागीरथीमध्ये बुडवू, असे म्हटले होते. कुणाच्या जीवावर ते एवढी हिंमत करतात? यांनी बंगालमध्ये हिंदूंना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवले. तुष्टीकरणासाठी ते एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेले आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न करताहेत." 

Web Title: PM Narendra Modi holds roadshow in Patna, Lok Sabha elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.