परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:35 AM2018-09-22T00:35:00+5:302018-09-22T00:36:17+5:30

सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आली.

Parbhani: Violence of the traffic controller | परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव

परभणी : वाहतूक नियंत्रकास विद्यार्र्थ्यांचा घेराव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): सेलू ते वालूर मार्गावरील दुपारी सोडण्यात येणाऱ्या बसफेºया वारंवार रद्द तर कधी वेळेवर जात नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकास घेराव घातला. यावेळी बस नियमित सोडण्याची मागणी करण्यात आली.
सेलू ते वालूर या मार्गावर राजवाडी, ब्राह्मणगाव, डुघरा, राजा, वालूर या पाच गावांतील २५० ते ३०० विद्यार्थी शिक्षणासाठी सेलू शहरात बसने ये-जा करतात; परंतु, सेलू बसस्थानकातून दुपारी दीडची बसफेरी काही दिवसांपासून वाहकाअभावी रद्द केली जात आहे.
शुक्रवारी वालूरकडे जाणारी दुपारी २.१५ ची बसफेरी चालक उपलब्ध नसल्याने बसस्थानकात उभी राहिली. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियंत्रक गणेश पवार यांनी घेराव घालून जाब विचारला. दुपारी दीड वाजेची वालूरकडे जाणारी बसफेरी अनेक दिवसांपासून वाहक व चालकाअभावी रद्द केली जात आहे. त्यामुळे वालूर मार्गावरील विद्यार्थ्यांना तासंतास बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वादोन व तीन वाजेच्या दोन्ही बसफेºया रद्द झाल्याने विद्यार्थ्यांची एकच गर्दी झाली.
दुपारच्या बसफेºया सातत्याने रद्द होत असल्याने आणि कधी कधी उशिराने बस लागल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांची गर्दी होत असे. बसमध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही.
वालूर मार्गावरील बसफेºयांचे नियोजन कोलमडले आहे. वाहतूक नियंत्रकही विद्यार्थ्यांना उत्तरे देत नाहीत, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी २१ सप्टेंबर रोजी संतप्त होत वाहतूक नियंत्रक गणेश पवार यांना घेराव घालून आंदोलन केले. सेलू-वालूर या मार्गावर नियमित बसफेºया सोडण्यात येतील, असे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी घेराव आंदोलन मागे घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
आगारप्रमुखांना : विद्यार्थ्यांचे साकडे
सेलू-वालूर या मार्गावरील बसफेºयांचे वेळापत्रक अनियमित झाले आहे. तसेच रद्दही केल्या जात आहेत. वेळेवर बस मिळत नसल्याने मासिक पास असूनही विद्यार्थ्याना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे.
त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. फेºया रद्द होण्याचे प्रकारही वाढले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. पाथरी आगाराने नियमित व वेळेवर बसफेºया सोडाव्यात, अशी मागणी बालाजी हरकळ व विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे २१ सप्टेंबर रोजी पाथरी येथील आगारप्रमुखांकडे केली आहे.

Web Title: Parbhani: Violence of the traffic controller

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.