परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:18 AM2018-09-27T00:18:57+5:302018-09-27T00:19:51+5:30

मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.

Parbhani: In the third phase, nine villages have got subsidy | परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

परभणी : तिसऱ्या टप्प्यात नऊ गावांचे अनुदान रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): मागील वर्षीच्या खरीप हंगामात बोंडअळीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील नऊ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांना बोंडअळीचे अनुदान मिळाले नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच पावसाने महिनाभरापासून डोळे वटारल्याने शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.
मानवत हा कापसाचे उत्पादन घेणारा तालुका आहे. कापूस, तूर, सोयाबीन या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मागील वर्षी कापसावर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला होता. त्यामुळे शेतकºयांना पुरेसे उत्पन्न मिळाले नव्हते. प्रादूर्भावग्रस्त क्षेत्रासाठी राज्य शासनाने अनुदान मंजूर केले होते. मानवत तालुक्यातील तहसील व कृषी कार्यालयाच्या वतीने २९ हजार ३९६ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त कापसाचे पंचनामे करून ३७ हजार ६२ शेतकºयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. या अहवालावरून शासनाने ५ कोटी ३२ लाख ९१ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाकडे वर्ग केली होती.
त्यातून सावळी, हत्तलवाडी, बोंदरवाडी, मांडेवडगाव, टाकळी नि., गोगलगाव, शेवडी ज., पार्डी, इरळद, सावंगी, वझूर बु., पोंहडूळ, आंबेगाव, आटोळा, हमदापूर, खडकवाडी, किन्होळा बु., मानोली, कोल्हावाडी, साखरेवाडी या वीस गावांमधील शेतकºयांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्यातील रक्कम वर्ग करण्यात आली. शासनाकडून दुसºया टप्यात जुलै महिन्यात ७ कोटी ९९ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम तहसील कार्यालयाला प्राप्त झाली होती.
अद्याक्षराप्रमाणे गावांची निवड यादी तयार करून इटाळी, उक्कलगाव, करंजी, कुंभारी, केकरजवळा, कोथाळा, कोल्हा, जंगमवाडी, ताडबोरगाव, थार, देवळगाव, नरळद, नागरजवळा, पाळोदी, पिंपळा, भोसा, मंगरूळ पा.प., मंगरूळ बु., मानवत, राजूरा, वांगी या २२ गावांतील व रुढी, रत्नापूर येथील काही शेतकºयांना अशा २४ गावांतील कापूस उत्पादक शेतकºयांच्या खात्यावर रक्कम जमा करून वाटप करण्यात आली. मात्र नऊ गावांतील ५ हजार ५४८ शेतकºयांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. या नुकसानग्रस्त शेतकºयांसाठी आणखी ३ कोटी १० लाख २८ हजार रुपयांची आवश्यकता आहे. तालुका प्रशासनाबरोबरच शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतकºयांना करावी: लागतेय उसणवारी
दुसºया टप्यातील ७ कोटी ९९ लाख ५७ हजार रुपयांमधून उर्वरित ३३ गावांतील शेतकºयांना अनुदान वाटप होईल, असे वाटत होते. मात्र या रकमेतून तालुक्यातील केवळ २२ गावातील शेतकºयांच्या खात्यावर आणि रुढी गावातील ५७७, रत्नापूर येथील ३६३ अशा १५ हजार ३९१ शेतकºयांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली. उर्वरित लोहरा, रामेटाकळी, रामपुरी, वझूर खु., सारंगपूर, सावरगाव, सोनूळा, सोमठाणा, हटकरवाडी या नऊ गावांतील ५ हजार ५८४ शेतकºयांना अनुदानासाठी तिसºया टप्प्याची प्रतीक्षा आहे. अनुदान वेळेत मिळत नसल्याने यंदाच्या हंगामात उसणवारी करून पेरणी करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे.
पावसाचा खंड वाढला
एकीकडे प्रशासकीय स्तरावरून अनुदान मिळत नसल्याने चिंता वाढत असतानाच दुसरीकडे पावसाचा खंड वाढल्याने पिकांची स्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे खरीप हंगामात नुकसान सहन करावे लागण्याची भीती शेतकºयांमध्ये निर्माण झाली असून शेतकºयांची धाकधूक वाढली आहे.
बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकºयांसाठी तिसºया टप्प्याचे अनुदान मिळावे, यासाठी वरिष्ठ कार्यालयात पत्र व्यवहार सुरू आहे.
डी.डी. फुफाटे, तहसीलदार, मानवत

Web Title: Parbhani: In the third phase, nine villages have got subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.