परभणी : इशाऱ्यानंतरही तलाठी, मंडळ अधिकारी संपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 11:43 PM2019-01-07T23:43:31+5:302019-01-07T23:43:53+5:30

येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता़ त्यानंतरही संप करण्यात आला़

Parbhani: Talathi, Board Official Collapse After Tip | परभणी : इशाऱ्यानंतरही तलाठी, मंडळ अधिकारी संपात

परभणी : इशाऱ्यानंतरही तलाठी, मंडळ अधिकारी संपात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन मागे घ्यावे, यासह इतर अनेक मागण्यांसाठी पुकारलेल्या संपात पहिल्याच दिवशी सर्वच्या सर्व मंडळ अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग नोंदविला़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता़ त्यानंतरही संप करण्यात आला़
जिल्ह्यात तलाठी विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून समोर आला आहे़ तलाठी राजू काजे आणि मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप करीत तलाठी संघटनेने हे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती़ तसेच वाळुची कामे, बायोमॅट्रिकलाही विरोध दर्शविला होता़
या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांनी ५ जानेवारी रोजी लेखीपत्राद्वारे स्पष्टीकरण देऊन केलेले निलंबन योग्य असून, संप मागे घ्यावा, अन्यथा मेस्मा आणि आपत्ती कायद्यान्वये कार्यवाही करण्याचा इशारा दिला होता़ त्यामुळे सोमवारी किती कर्मचारी संपात सहभागी होतात, याकडे लक्ष लागले होते़
सकाळी तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हाधिकाºयांसमोर घोषणाबाजी केली़ या आंदोलनात २३० तलाठी आणि ४२ मंडळ अधिकारी सहभागी झाले होते़ कर्मचाºयांनी संप पुकारल्यानंतर दिवसभरात मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला़ अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी तलाठी संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली़ निलंबन मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसादही दिला़ काही मागण्याही मान्य करण्या संदभात चर्चा झाली़ परंतु, या बैठकीत तोडगा निघाला नसल्याचे समजले़
दरम्यान, तलाठी, मंडळ अधिकाºयांनी जाहीररीत्या जिल्हा प्रशासनासमोर आंदोलन केले नसले तरी कर्मचारी कामावर उपस्थित नव्हते़ सायंकाळी उशिरापर्यंत या संदर्भात काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़
जिल्हाधिकाºयांसमोर कर्मचाºयांची घोषणाबाजी
४तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला असून, सकाळी जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर कार्यालयात दाखल होत असताना या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी करून आपला रोष व्यक्त केला़ तलाठी राजू काजे, मंडळ अधिकारी पी़ आऱ लाखकर यांचे निलंबन रद्द करावे, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाºयांनी ७ जानेवारीपासून बेमुदत संप सुरू केला आहे़ या संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी मेस्मा अंतर्गत कार्यवाहीचा इशारा दिला होता़ तरीही कर्मचारी संपात सहभागी झाले असून, सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर कार्यालयात दाखल होत असताना या कर्मचाºयांनी जोरदार घोषणाबाजी केली़
बायोमेट्रिकवर जिल्हाधिकारी ठाम
तलाठी व मंडळ अधिकाºयांनी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यास विरोध केला आहे़ सोमवारी झालेल्या चर्चे दरम्यान, इतर मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांनी सकारात्मकता दर्शविली असली तरी बायोमेट्रिक संदर्भात मात्र त्यांनी ठाम भूमिका घेतली़ बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविणे बंधनकारकच असल्याचे सांगितले़ चर्चेनंतरही तोडगा निघू शकला नाही़ त्यामुळे उद्या या संदर्भात काय निर्णय होतो, याकडे कर्मचाºयांचे लक्ष लागले आहे़
संप सुरूच राहणार
सोमवारी जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांसमवेत दोन वेळा बैठका झाल्या़ सुरुवातीला अप्पर जिल्हाधिकारी आण्णासाहेब शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली़ त्यानंतर जिल्हाधिकारी पी़ शिव शंकर यांच्या उपस्थितीतही बैठक झाली़ या बैठकीत जिल्हाधिकाºयांनी काही मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली़ परंतु, लेखी आश्वासन मिळाले नाही़ त्यामुळे संप मागे घेतला नसल्याची माहिती तलाठी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस देवेंद्रसिंह चंदेल यांनी दिली़ त्यामुळे दिवसभराच्या चर्चेतून संपासंदर्भात तोडगा निघाला नसल्याचेच दिसून आले़

Web Title: Parbhani: Talathi, Board Official Collapse After Tip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.