परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:12 AM2019-05-10T00:12:25+5:302019-05-10T00:13:21+5:30

जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़

Parbhani: The sugarcane area of 20 thousand acres in danger | परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

परभणी : वीस हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जिल्ह्यात ऊस पिकाचे सर्वाधिक क्षेत्र असलेल्या पाथरी तालुक्यात पाण्याअभावी उभ्या उसाचे अक्षरश: चिपाट होत आहे. जायकवाडीच्या डाव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी ऊस जगविला खरा; मात्र उन्हाची तीव्रता आणि भूजल पातळी खालावल्यामुळे शेतातील ऊस पीक जळून जात आहे. त्यामुळे २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़
गतवर्षी या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले आहे़ आॅगस्ट महिन्यात पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली़ त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी प्रचंड खालावली आहे़ उपलब्ध पाण्याचे स्रोतही आटत आहेत़ पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत़ या कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते़ तालुक्यात सर्वाधिक उस लागवडीचे क्षेत्र आहे़ या भागातील पाथरी आणि लिंबा येथील दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम संपल्यानंतर या भागात किमान २० हजार एकर उसाचे क्षेत्र असल्याची नोंद आहे़
कारखाना कार्यक्षेत्रातील पाथरी, मानवत, सोनपेठ भागात अत्यल्प पावसाने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत़ सिंचनासाठी पाणी नसल्याने बागायती पिके जळून जात आहेत़ जायकवाडी धरण्याच्या डाव्या कालव्यावर या भागातील उसाचे क्षेत्र पूर्णत: अवलंबून आहे़ जायकवाडीचे दोन पाणी अवर्तन सुटल्याने या भागातील शेतकऱ्यांनी ऊस जोपासला़ परंतु, सध्या शाश्वत पाणीपुरवठा करणारे जलस्त्रोत आटले आहेत़ त्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून करण्यात येणारा पाणीपुरवठाही बेभरोस्याच्या झाला आहे़ त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे़ परिणामी शेतकरी अडचणीत आहेत.
बंधारे कोरडे पडल्याने दाहकता वाढली
च्सद्यस्थितीत गोदावरीच्या पात्रातील ढलेगाव आणि मुदगल दोन्ही बंधारे कोरडे पडले आहेत़ बंधाºयातील पाणी कमी झाल्याने गोदावरी पात्रात काही ठिकाणी सिंचनासाठी बसवलेले कृषी पंप महसूल प्रशासनाने काढून घेतले आहेत़
च् जायकवाडी धरणाचे पाणी सोडण्यात आले नाही़ या भागात पाण्याचे संकट अधिक गंभीर बनले आहे़ उपलब्ध उसाच्या क्षेत्रापैकी २० हजार एकरवरील क्षेत्र आज धोक्यात आले आहे़
च्ऊस उत्पादक शेतकरी शेतातील उभा ऊस जाळून चिपाट होत असताना पाहात आहेत़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकºयांच्या होणाºया नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक कोंडीत सापडलेल्या ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़
तालुक्यात बेभरवशाच्या सिंचन सुविधा
च्पाथरी तालुक्यात गोदावरीच्या पात्रातील दोन्ही बंधारे आणि जायकवाडी धरणाचा डावा कालवा हे दोन्ही सिंचन सुविधांचे स्रोत बेभरवशाचे वाटू लागले आहेत़
च्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकºयांना हातची पिके जळत असताना पहावी लागत आहेत़ त्यामुळे जायकवाडी डाव्या कालव्याच्या कार्यक्षेत्रात येणाºया शेतकºयांसाठी शाश्वत पाणीपुरवठा होईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे़
च्पाटबंधारे विभागाने पावले उचलत दुष्काळात सापडलेल्या बागायतदार शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे़

Web Title: Parbhani: The sugarcane area of 20 thousand acres in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.