परभणी : भुयारी पुलात साचले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 12:12 AM2019-06-10T00:12:23+5:302019-06-10T00:12:55+5:30

परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.

Parbhani: Stormy water in the suburbs | परभणी : भुयारी पुलात साचले पाणी

परभणी : भुयारी पुलात साचले पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): परभणी-मानवतरोड रेल्वे मार्गावर कोल्हावाडी गाव असून या गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे विभागाने भुयारी पूल उभारला आहे; परंतु, पहिल्याच पावसाने या पुलात पाणी साचल्याने गावाला जाणारा रस्ता बंद पडला आहे.
तालुक्यातील कोल्हावाडी गावाला जोडणारा हा एकमेव राज्य रस्ता आहे. या रस्त्यावर परभणी-मानवतरोडला जाणारी रेल्वे लाईन आहे. रेल्वे प्रशासनाने कोल्हावाडी गावाला जोडणाºया रस्त्यावर भुयारी मार्ग तयार केला आहे.
भुयारी मार्ग बनविला खरा. मात्र पुलात साचणारे पाणी बाहेर काढण्यासाठी अद्याप कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने या पुलात ४ फूट पाणी साचून रस्ता बंद पडला आहे. त्याचबरोबर पुलाच्या बाजूने खोदकाम केले मात्र, सिमेंट कॉन्क्रीट केले नसल्याने चिखल साचला आहे.
रेल्वे रुळावरून उचलून न्यावी लागली वाहने
४मान्सनपूर्व पहिल्याच पावसात रेल्वे विभागाने उभारलेल्या भुयारी पुलामध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे कोल्हावाडीकडे जाणारा रस्ता बंद पडला. परिणामी दुचाकीस्वारांना रस्ता ओलांडावा कसा? असा प्रश्न पडला.
४अनेकांनी दुचाकी वाहने रेल्वे रुळावरून उचलून नेत धोकादायक मार्ग पत्कारला. तेव्हा भुयारी पुलातील पाणी इतरत्र काढून देऊन ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी कोल्हावाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
४दरम्यान, कोल्हावाडी ग्रामस्थांची सुविधा व्हावी यासाठी रेल्वे विभागाने उभारलेला भुयारी पूल सोयीचा ठरण्याऐवजी गैरसोयीचाच जास्त ठरत असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Stormy water in the suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.