परभणी : जोतिबांबरोबर सावित्रीबार्इंचाही पुतळा उभारा -छगन भुजबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:40 AM2019-01-26T00:40:15+5:302019-01-26T00:40:35+5:30

महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बाजूला उभा करा, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे बोलताना केले.

Parbhani: Savitribaiye statue raised with Jyotiben - Chhagan Bhujbal | परभणी : जोतिबांबरोबर सावित्रीबार्इंचाही पुतळा उभारा -छगन भुजबळ

परभणी : जोतिबांबरोबर सावित्रीबार्इंचाही पुतळा उभारा -छगन भुजबळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावित्रीबाई फुले यांचाही पुतळा बाजूला उभा करा, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथे बोलताना केले.
परभणी महानगरपालिकेच्या वतीने प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमजवळ क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या जागेचे भूमिपूजन आणि सुशोभीकरण कामाचे छगन भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, महापौर मीनाताई वरपूडकर, जि.प. अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, माजीमंत्री सुरेश वरपूडकर, समता परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा मंजिरी घाडगे, अनिल गोरे, माजी आ. सुरेश देशमुख, आ.रामराव वडकुते, महानगराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रताप देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले की, ज्या काळात मुलींनी शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जात होते, त्या काळात प्रचंड यातना सहन करुन सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्यामुळे त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. प्रास्ताविकात माजी महापौर प्रताप देशमुख यांनी २००६ मध्ये या ठिकाणी पुतळ्याची जागा आपण निश्चित केली होती; परंतु, नंतर काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुतळा उभारण्याच्या कामात दिरंगाई झाल्याचे सांगितले. आभार माजी उपमहापौर भगवान वाघमारे यांनी मानले. सूत्रसंचालन नगरसेवक बंडू पाचलिंग यांनी केले.
‘तीन महिन्यांत पुतळ्याचे काम पूर्ण करणार’
४बहुजन जागृती समता मेळाव्यात, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलताना माजी मंत्री सुरेश वरपूडकर म्हणाले की, मनपाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. याच अनुषंगाने बोलताना आ.बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, सकाळी पुतळा सुशोभीकरण उद्घाटन कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याबरोबरच सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारण्याची केलेली मागणी पूर्ण करण्याचा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला असून तीन महिन्यांत दोन्ही पुतळे उभारले जातील, असे ते म्हणाले. याबाबतच बोलताना आ.रामराव वडकुते यांनी पुतळ्यांच्या कामासाठी ५ लाख रुपयांचा निधी देत असल्याचे जाहीर केले.

Web Title: Parbhani: Savitribaiye statue raised with Jyotiben - Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.