परभणी : ‘होमगार्ड जवानांवरील अन्याय दूर करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:57 PM2019-04-09T23:57:12+5:302019-04-09T23:57:59+5:30

सेवेतून कमी केलेल्या होमगार्ड सैनिकांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, अशी मागणी येथील होमगार्डनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

Parbhani: 'Remove injustice against homeguard jaw' | परभणी : ‘होमगार्ड जवानांवरील अन्याय दूर करा’

परभणी : ‘होमगार्ड जवानांवरील अन्याय दूर करा’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सेवेतून कमी केलेल्या होमगार्ड सैनिकांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे, अशी मागणी येथील होमगार्डनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
होमगार्डच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी आतापर्यंत राज्यभरात अनेकवेळा आंदोलने झाली होती. राज्यातील विविध कारणांनी सेवा समाप्त केलेल्या होमगार्डंचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन त्यांना संघटनेत सामावून घेण्याची संधी द्यावी, अशी मागणी होमगार्डस्च्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार होमगार्ड पुनर्नोंदणीच्या शारीरिक चाचणीत काही होमगार्ड अपात्र ठरत असतील तर त्यांना एक महिन्याचे प्रशिक्षण देऊन होमगार्ड संघटनेत पुन्हा सामावून घ्यावे, असा निर्णय शासनाने घेतला होता. त्यामुळे होमगार्डस्ना दिलासा मिळाला होता; परंतु, यासंदर्भात परिपत्रक काढूनही एकाही सैनिकास सेवेत घेतले नाही. तेव्हा या होमगार्डंना परत संघटनेत घ्यावेत, अशी मागणी दत्ता धनवटे, शाम पुंडगे, रामचंद्र गायकवाड, सुनील खाडे, एजाज अन्सारी आदींनी केली आहे.

Web Title: Parbhani: 'Remove injustice against homeguard jaw'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.