परभणी: काचबिंदू जनजागृतीसाठी शहरातून निघाली रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 11:41 PM2019-03-10T23:41:22+5:302019-03-10T23:41:56+5:30

येथील नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने रविवारी काचबिंदू जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली.

Parbhani: Rally from the city for public awareness of glaucoma | परभणी: काचबिंदू जनजागृतीसाठी शहरातून निघाली रॅली

परभणी: काचबिंदू जनजागृतीसाठी शहरातून निघाली रॅली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या वतीने रविवारी काचबिंदू जनजागृतीसाठी शहरातून रॅली काढण्यात आली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात सकाळी ९ वाजता या रॅलीचे उद्घाटन झाले. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रकाश डाके, आयएमएचे अध्यक्ष डॉ.परमेश्वर सावळे यांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते कल्याणनगर परिसरातील आयएमए हॉलपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शहरातील सर्व नेत्रतज्ज्ञ, आयएमएचे सचिव डॉ.अमिताभ कडतन, जिल्हा नेत्र रुग्णालयातील डॉ.अर्चना काळे, नेत्र अधिकारी संघाचे अध्यक्ष मोरे, लायन्स क्लबचे रितेश झांबड, डॉ.प्रवीण धाडवे, नेत्र तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय टाकळकर, सचिव डॉ.संदीप वानखेडे, डॉ.सुनील चिलगर, डॉ.राजेश मंत्री, डॉ.हनुमंत भोसले, आॅप्टीशियन असोसिएशनचे अध्यक्ष डावरे, औषधी विक्रेता संघटनेचे संजय मंत्री, अब्दुल मजहर, प्रा.अरुण पडघन, तालुका होमगार्ड प्रमुख जाधव यांच्यासह विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते.
जनजागृती सप्ताहास सुरुवात
४या रॅलीच्या समारोप कार्यक्रमात नेत्रतज्ज्ञांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ.विजय शेळके यांनी काचबिंदू संदर्भात माहिती दिली. तसेच आयएमए हॉल येथे तज्ज्ञ डॉक्टरांनी काचबिंदू संदर्भात मार्गदर्शन व तपासणी केली. १० मार्चपासून ते १७ मार्चपर्यंत काचबिंदू जनजागृती सप्ताह साजरा केला जाणार आहे.

Web Title: Parbhani: Rally from the city for public awareness of glaucoma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी