परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 12:44 AM2019-04-18T00:44:06+5:302019-04-18T00:44:22+5:30

जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.

Parbhani: Rain with thunderstorms | परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

परभणी: विजांच्या कडकडाटासह पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी दुपारी वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस झाल्याने हळद, ज्वारी इ. पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले.
वादळी वाºयासह विजांचा कडकडाट व गारांचा पाऊस झाल्याने ग्रामस्थांची मोठी धावपळ झाली. मंगळवारी रात्री वातावरणामध्ये अचानक बदल होऊन पावसाला सुरूवात झाली. अनेक ठिकाणी गारांचा पाऊसही झाल्याची माहिती समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरात मंगळवारी रात्री झालेल्या पावसाने हळदीच्या पिकासह आंब्याचे नुकसान झाले. बुधवारी सकाळी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
सेलू शहरासह परिसरात मंगळवारी रात्री ७.३० वाजता पाऊस झाला. त्याचबरोबर देवगावफाटा येथेही १५ मिनिटे वाºयासह पाऊस झाल्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. मानवत शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यात कोठेही नुकसान झाले नसल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. सोनपेठमध्ये मंगळवारी सकाळी १० मिनिटे पाऊस झाला. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते.
बामणी परिसर : नऊ गावे २४ तासांपासून अंधारात
बामणी- बामणी व परिसरात मंगळवारी सायंकाळी वादळी वाºयासह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे नऊ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला असून, २४ तासांपासून ही गावे अंधारात आहेत.
मंगळवारच्या वादळी वाºयामध्ये बामणी व सावंगी भांबळे येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेले. बामणी, संक्राळा, कोलपा, कोरवाडी, कुंभेफळ, सावंगी, धमधम, असोला, कावी आदी गावांत विद्युत खांब कोसळले तसेच तारा तुटल्या आहेत.
जखमी वृद्धाचा मृत्यू
सावंगीत परमेश्वर भांबळे, दिलीप खाडे, नारायण खाडे, शिवाजी खाडे, सोपान खाडे, कमलाबाई खरात यांच्या घरांच्या भितीला तडे जाऊन भिंती पडल्या. या घटनेत सावंगी भांबळे येथील ग्यानोजी मोरे (७०) हे पत्र्यावरून पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना मंगळवारी रात्री उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; परंतु, १७ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला.
शहापूरमध्ये २० मिनिटे गारपीट
परभणी- तालुक्यातील शहापूूर येथे मंगळवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. या पावसामध्ये सलग २० मिनिटे गारा पडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.
दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून सोसाट्याच्या वादळी वाºयासह विजांचा कडकडाट होत आहे. त्यातच मंगळवारी रात्री झालेल्या पावसामध्ये शहापूर येथे २० मिनिटे गारा पडल्या.
या गारांमुळे शहापूर व परिसरातील हळद, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. या पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Rain with thunderstorms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.