परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 11:53 PM2018-10-16T23:53:22+5:302018-10-16T23:53:53+5:30

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़

Parbhani question serious: 25 days remaining water | परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

परभणीचा प्रश्न गंभीर : २५ दिवसांचेच पाणी शिल्लक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहटी येथील बंधाºयात केवळ २५ दिवसांचेच पाणी शिल्लक असून, आगामी काळातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन केले आहे़ या नियोजनावर १७ आॅक्टोबर रोजी मुंबईत होणाºया बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे़
परभणी शहराला पाणीपुरवठा करणाºया राहटी बंधाºयामध्ये पाणी संपत आले आहे़ सध्या या बंधाºयात केवळ २५ ते ३० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे़ बंधाºयातील उपलब्ध पाणी जास्तीत जास्त दिवस पुरविण्यासाठी प्रशासनाला कडक उपाययोजना कराव्या लागणार आहेत़ जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तुलनेत ४० टक्के पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचे संकट आतापासूनच गंभीर होत चालले आहे़ पुढील वर्षातील पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी वापरावे लागणार असल्याने आतापासूनच पाणी आरक्षणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात बैठक झाली़ या बैठकीत महानगरपालिका प्रशासनाने परभणी शहरासाठी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत ८ दलघमी पाणी लागेल, असा अहवाल दिला आहे़ परभणी शहराला येलदरी येथील धरणातून पाणी घेतले जाते़ येलदरी प्रकल्पात पाणीसाठा जमा झाला नसल्याने दोन वर्षांपासून येलदरी प्रकल्पातून राहटी बंधाºयासाठी पाणी मिळत नाही़ परिणामी शहरवासियांना निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घ्यावे लागते़ मात्र यावर्षी निम्न दूधना प्रकल्पातही पुरेसा पाणीसाठा नसल्याने या प्रकल्पातून किती पाणी मिळते? यावरच परभणीकरांच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे़ दरम्यान, महानगरपालिकेने केलेल्या नियोजनानुसार येलदरी प्रकल्पातून चार पाणी पाळ्या आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या घेण्याचे निश्चित केले आहे़ हा अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर केला असून, बुधवारी मुंबई येथे पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित बैठकीत या आरक्षणाला मंजुरी मिळणार आहे़ राहटी येथील बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १़५२ दलघमी एवढी आहे़ एक पाणी पाळी घेतल्यानंतर शहरवासियांना ४५ दिवस हे पाणी पुरते़ साधारणत: ८ दलघमी पाणी शहराला लागणार आहे़
असे करावे : लागेल आरक्षण
जुलै महिन्यापर्यंत परभणी शहराला ८ दलघमी पाणी लागणार आहे़ राहटी बंधाºयात ८ दलघमी पाणी घेण्यासाठी प्रत्यक्षात प्रकल्पांमध्ये तिप्पट पाण्याचे आरक्षण करावे लागते़ परभणी शहराला येलदरी धरणातून पाण्याचे आरक्षण केल्यास येलदरी धरणाचे पाणी सिद्धेश्वर धरणात सोडले जाते़ सिद्धेश्वरपासून राहटी बंधारा ४७ किमी अंतरावर आहे़ प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी १ दलघमी पाणी घेतले जाते़ हे पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी प्रकल्पातून किमान ५ ते ७ दलघमी पाणी सोडावे लागते़ तसेच निम्न दूधना प्रकल्पातून पाणी घेण्यासाठीही आरक्षित पाण्याच्या तुलनेत तीनपट अधिक पाणी नदीपात्रात सोडावे लागते़ निम्न दूधना प्रकल्पापासून राहटी बंधारा ६५ किमी अंतरावर असून, या अंतरानुसार आरक्षित पाणी देण्यासाठी त्या पटीने नदीपात्रात पाणी सोडावे लागते़
बंधाºयाच्या प्लेट बदलणार
राहटी बंधाºयाच्या निर्मितीपासून आजपर्यंत प्लेट बदलल्या नाहीत़ त्यामुळे जुन्या झालेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत असल्याने नवीन प्लेट टाकण्याचे नियोजन वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाने तयार केले आहे़ सध्या उपलब्ध असलेला पाणीसाठा संपल्यानंतर बंधाºयाच्या प्लेट बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे, अशी माहिती मिळाली़

Web Title: Parbhani question serious: 25 days remaining water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.