परभणी : पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी बनविण्याची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:51 AM2019-05-16T00:51:41+5:302019-05-16T00:52:18+5:30

येथील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ मे पर्यंत याद्या अद्यावत केल्या जाणार आहेत. या पदासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोट निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Parbhani: Preparation of voter list for bye-elections | परभणी : पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी बनविण्याची तयारी

परभणी : पोटनिवडणुकीसाठी मतदार यादी बनविण्याची तयारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): येथील रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या पोट निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्या अद्यावत करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून २९ मे पर्यंत याद्या अद्यावत केल्या जाणार आहेत. या पदासाठी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोट निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत येथील नगराध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गाला सुटले होते. शिवकन्या स्वामी यांनी या प्रवर्गातील माला जंगम या जातीचे प्रमाणपत्र जोडून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणुकीत अर्ज दाखल केला होता. कॉँग्रेसचे उमेदवार बाबूराव नागेश्वर यांचा पराभव करून स्वामी विजयी झाल्या होत्या. मात्र जात पडताळणी समितीने शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र २१ जुलै रोजी अवैध ठरविले होेते. मात्र स्वामी यांनी या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
सुनावणी दरम्यान, ८ आॅगस्ट २०१८ रोजी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळविण्यात स्वामी यांना यश आले होते. मात्र २२ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने अंतिम न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून पोट निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याची परवानगी दिली. या आधारे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना प्रारुप मतदार याद्या करण्याचे लेखी आदेश दिले. या आदेशानुसार मतदार याद्या अद्यावत करण्याची लगबग पालिकेत सुरू झाली आहे. १७ मे रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, २१ मे पर्यंत प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल केल्या जाणार आहे. २७ मे रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, २९ मे रोजी मतदान केंद्रांची प्रसिद्धी आणि मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मतदार यादीचा कार्यक्रम संपल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचा निर्णय न्यायालयाच्या आधीन
४जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने नगराध्यक्ष शिवकन्या स्वामी यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले होेते. या निर्णयाच्या विरोधात स्वामी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधिन राहून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश २२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने दिले होते. त्यावरून राज्य निवडणूक आयोगाने पालिकेच्या रिक्त असलेल्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया सुरू केली आहे.
४दुसरीकडे या प्रकरणात उच्च न्यायालयात जात पडताळणी समितीच्या निर्णयाच्या विरोधात सुनावणी सुरू आहे. या संदर्भात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तारीख असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे न्यायालयाचा अंतिम निर्णय काय येतो? याकडे सत्ताधारी गटासह विरोधकांचे लक्ष लागले आहे.
४शिवकन्या स्वामी यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्याने ३ आॅगस्ट २०१८ रोजी उपाध्यक्ष राणी अंकुश लाड यांच्याकडे नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपविण्यात आला होता. मागील नऊ महिन्यांपासून मानवत नगराध्यक्षपदाचा पदभार लाड यांच्याकडेच आहे. सध्या नगरपालिकेत मतदार याद्या अद्यावत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत उत्सुकता लागली आहे.

Web Title: Parbhani: Preparation of voter list for bye-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.