परभणीत राष्ट्रीय संमेलन :धर्म मानणाºयांनी शांततेसाठी एकत्र येण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 12:33 AM2017-12-17T00:33:51+5:302017-12-17T00:34:08+5:30

देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़

Parbhani National Convention: The need to assemble for peace is to get together for peace | परभणीत राष्ट्रीय संमेलन :धर्म मानणाºयांनी शांततेसाठी एकत्र येण्याची गरज

परभणीत राष्ट्रीय संमेलन :धर्म मानणाºयांनी शांततेसाठी एकत्र येण्याची गरज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशातील वातावरण बदलत चालले आहे़ अशांती, अत्याचार, द्वेषाची भावना वाढत असून, दु:ख या गोष्टीचे आहे की याबाबी धर्माच्या अडून केल्या जात आहेत़ त्यामुळे धर्म मानणाºयांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन धर्मगुरु दलाईलामा यांचे उत्तराधिकारी लामा लोबजंग यांनी केले़
सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनी आणि पद्मभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवारी परभणी येथील बी़ रघुनाथ सभागृहात राष्ट्राच्या सामाजिक, सांप्रदायिक व आर्थिक समस्यांवर आधारित राष्ट्रीय चर्चासत्र पार पडले़ या प्रसंगी लामा लोबजंग बोलत होते़ कार्यक्रमास दिल्ली येथील कॅन्सर इंन्स्टिट्युटचे सहसंचालक अब्दुल मन्नान, मॅक्सीसी अवार्ड विजेते प्रो.संदीप पांडे, विजयवाडा येथील फारुक शुबली, फादर डॉ.बेन्नी कल्लीकट, शहीद भगतसिंग यांचे भाचे प्रो.जगमोहन सिंग, नियोजन आयोगाच्या माजी सदस्या पद्मश्री सय्यदा सैयदैन हमीद, डॉ.मकदुम फारुकी, उद्योजक अब्दुल मजीद पारेख, महापौर मीनाताई वरपूडकर, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, उपमहापौर माजू लाला, मनपाचे गटनेते भगवान वाघमारे, प्रवीण देशपांडे, हमीद मलीक, पंकज खेडकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, दिल्ली येथील सोसायटी फॉर कम्युनल हार्मोनीचे कार्यकारी सदस्य तथा आयोजक अ‍ॅड.मुजाहेद खान आदींची उपस्थिती होती़ लोबजंग म्हणाले, एकमेकांचा द्वेष करणे, अत्याचार करणे अशी शिकवण कोणताही धर्म देत नाही़ परंतु़, धर्माच्या आडून या गोष्टी होत आहेत़ त्यामुळे जगात शांती निर्माण करावयाची असेल तर धर्म मानणाºया व्यक्तींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज निर्माण झाली आहे़ प्रेमाच्या माध्यमातूनच शांती प्रस्थापित होते़ तथागत गौतम बुद्ध यांनी सांगितले आहे की, ‘वैर से वैर’ या नितीने शांती प्रस्थापित होत नाही़ त्यामुळे मैत्री, प्रेम आवश्यक आहे़ मन हेच यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे़ त्यामुळे मनावर ताबा मिळविला पाहिजे़ प्रत्येकाचे मन शांत आणि पवित्र झाले तर शांती प्रस्थापित होवू शकते़ मनावर ताबा मिळवा आणि चांगले कर्म करा, हीच शिकवण धर्माच्या माध्यमातून दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी विविध वक्त्यांनी देशाची सद्यस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात अब्दुल माजीद पारीख, मजहर अली खान, फारुख शुबली, फादर डॉ़ बेनी कालीकत, प्रा़ जगमोहन सिंग यांनीही मार्गदर्शन केले़ मुजाहेद खान यांनी प्रास्ताविक केले़

Web Title: Parbhani National Convention: The need to assemble for peace is to get together for peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.