परभणी : जेसीबीची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 12:59 AM2019-01-01T00:59:20+5:302019-01-01T01:00:10+5:30

किरायाणे चालविण्यासाठी दिलेल्या जेसीबी मशीनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Parbhani: JCB interactive; Filed the complaint | परभणी : जेसीबीची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

परभणी : जेसीबीची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी ): किरायाणे चालविण्यासाठी दिलेल्या जेसीबी मशीनची परस्पर विक्री केल्या प्रकरणी ३१ डिसेंबर रोजी मानवत पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मानवत तालुक्यातील केकरजवळा येथील मैनोद्दीन शेख जमाल शेख यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील खैरसरअली सय्यद अशरफ अली यांना आॅगस्ट महिन्यात त्यांच्या मालकीची जेसीबी मशीन किरायाणे चालविण्यासाठी दिली होती. आरोपी खैसर अली सय्यद याने मागील चार महिन्यांपासून जेसीबी मशीनचा कोणत्याही प्रकारचा हिशोब दिला नाही. याबाबत विचारपूस केली असता उडवाउडविची उत्तरे दिली. त्यामुळे आरोपी खैसर अली सय्यद अशरफ अली याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने फिर्यादी शेख यांनी अधिक चौकशी केली असता आरोपीने परस्पर जेसीबी मशीनची विक्री केल्याचे आढळून आले. त्यावरुन शेख याने मानवत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.

Web Title: Parbhani: JCB interactive; Filed the complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.