परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:19 AM2018-10-19T00:19:14+5:302018-10-19T00:19:44+5:30

परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.

Parbhani: Information not available to the administration | परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

परभणी : प्रशासनाकडे उपलब्ध नाही चाऱ्याची माहिती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ : परतीच्या पावसाने दगा दिल्याने तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन दुष्काळाच्या अनुषंगाने माहिती संकलित करण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे तालुक्यातील अधिकाºयांकडे उपलब्ध चाºयाची माहिती नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे दुष्काळा संदर्भातील उदासिनताच समोर येत आहे.
तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाचा ताण पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर दुसरीकडे ओला चारा कमी होत असल्याने जनावरांचीही उपासमार होण्याची शक्यता आहे. तालुक्यात एकूण किती चारा उपलब्ध आहे. आगामी काळात चारा संपला तर काय नियोजन करावे लागले, याचे आराखडे आतापासूनच तयार होणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडे चाºयाची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले.
तालुक्यात मागील रबी हंगाम आणि चालू वर्षीच्या खरीप हंगामात किती चारा शिल्लक आहे. याची माहिती घेतली असता पशूसंवर्धन विभागाने आमच्याकडे माहिती उपलब्ध नसून कृषी विभागाकडे ही माहिती मिळेल, असे सांगून हात वर केले.
कृषी विभागाकडे चाºयाची माहिती विचारली तेव्हा त्यांच्याकडेही ही माहिती नाही. त्यामुळे तालुक्यात एकीकडे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना दुसरीकडे तालुका कृषी कार्यालय आणि पशू संवर्धन विभाग मात्र चाºयाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. जर अधिकाºयांना चाºयाची माहितीच नसेल तर दुष्काळाचे नियोजन करणार कसे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
दररोज लागतो दीड लाख किलो चारा
एकोणविसाव्या पशूगणनेनुसार तालुक्यात ३५ हजार ६७१ जनावरे आहेत. या जनावरांना दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो सरासरी चारा लागतो. तालुक्यात गाय, म्हैस आणि बैल या जनावरांची संख्या १६८९६ तर शेळ्या आणि मेंढ्यांची संख्या ८ हजार ५३ एवढी आहे.
याशिवाय ६४१५ लहान जनावरे आहेत. लहान जनावरांना सरासरी ३ किलो आणि मोठ्या जनावरांना सहा किलो चारा लागतो. या अंदाजानुसार तालुक्याला दररोज १ लाख ४४ हजार ७८० किलो चाºयाची आवश्यकता आहे.
सद्यस्थितीत यापैकी किती चारा शिल्लक आहे, याचा मात्र अंदाज बांधण्याचे कामही प्रशासनातील अधिकारी करीत नसल्याने नियोजन कसे करणार? असा प्रश्न निर्माण होत आहे.

Web Title: Parbhani: Information not available to the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.